IB रिपोर्ट : वैश्विक सुरक्षा संकटकाळात परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना Z कॅटेगिरी सुरक्षा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वैश्विक सुरक्षा संकट काळात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण बनली असतानाच भारतीय नेत्यांच्या सुरक्षिततेविषयी विशिष्ट चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इंटेलिजन्स ब्युरोने IB सादर केलेल्या रिपोर्टच्या आधारावर केंद्रीय गृह मंत्रालयाने परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांची सुरक्षा व्यवस्था Y कॅटेगरीतून बदलून Z कॅटेगिरीची केली आहे. Z category security to External Affairs Minister Jaishankar in times of global security crisis

Z कॅटेगिरीतील सुरक्षा व्यवस्था निकषानुसार आता जयशंकर यांच्या समवेत नॅशनल सिक्युरिटी गार्डचे सशस्त्र कमांडोज त्यांच्याबरोबरच केंद्रीय रिझर्व पोलीस बलचे CRPF जवान आणि दिल्ली पोलीस असे तब्बल 36 कर्मचारी असणार आहेत.

देशात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह 176 व्हीव्हीआयपी म्हणजे अति महत्त्वाच्या नेत्यांना Z, Z+ आणि सुपर Z अशा कॅटेगिरीची सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामध्ये आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा समावेश झाला आहे.

मोदी सरकार मध्ये जयशंकर यांची कामगिरी अव्वल मानली जाते. भारताच्या परराष्ट्र धोरणात मोदी सरकारने आक्रमक बदल घडवून आणला. त्याची सगळी जबाबदारी आणि ऑपरेशन्स जयशंकर यांनीच पार पाडली. परराष्ट्रमंत्री होण्याआधी ते अमेरिका, रशिया आणि चीन या तीन महत्त्वाच्या देशांमध्ये भारताचे राजदूत होते. त्याचबरोबर त्यांनी भारताचे परराष्ट्र सचिव पदही सांभाळले होते.

आर्थिक सुधारणा घडवून आणताना माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना जशी डॉ. मनमोहन सिंह यांची अर्थमंत्री म्हणून साथ लाभली होती, तशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाच्या परराष्ट्र धोरणात आक्रमक बदल घडवून आणण्यासाठी सुब्रमण्यम जयशंकर यांनी साथ दिल्याची आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी वर्तुळात मान्यता आहे.

Z category security to External Affairs Minister Jaishankar in times of global security crisis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात