विशेष प्रतिनिधी
भोपाळ : टी शर्टवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा लिहून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या २१ वर्षीय युवकावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील हा तरुण असून त्याच्याविरुध्द बजरंग दलाच्या नेत्याने तक्रार केली होती.Youth arrested for writing pro-Pakistan slogans on T-shirt, charged under National Security Act
साहिल लल्ला या तरुणाने आपल्या टी शर्टवर पाकिस्तानचा झेंडा छापला होता. त्याचबरोबर जॉर्डन असे लिहिले होते. त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर पाकिस्तानी ध्वजासह टी-शर्ट घातलेला त्याचा फोटो आणि त्यावर जॉर्डन हा शब्द पोस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली. लल्ला याने ही पोस्ट केल्यावर त्याला दोन तासांच्या आत अटक करण्यता आली आहे.
सीबीआयचे माजी संचालक अलोक वर्मांविरोधात शिस्तभंगाची कारवाई, केंद्रीय गृहविभागाने केली शिफारस
बजरंग दलाचे जिल्हा संयोजक पिंटू कौशल यांनी या प्रकरणाची तक्रार चिमणगंज पोलिसांकडे केली होती. त्या तक्रारीवर कारवाई करत पोलिसांनी साहिल लल्लाला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला. लल्ला याच्यावर जातीय सलोखा बिघडविणे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हाही दाखल करण्यात आला.
उज्जैन जिल्हा प्रशासनाने मोहरम कार्यक्रमादरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत अटक केलेल्या दहापैकी चार जणांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याची शिफारस केली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 124 (ए), आणि 153 (दंगल घडवून आणू शकते) अंतर्गत पाक समर्थक घोषणाबाजी केल्याबद्दल आणि डझनहून अधिक लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राष्ट्रीय सुरक्षा कायदा एखाद्या व्यक्तीला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे समाधानी असल्यास किंवा त्याला सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणण्यापासून रोखण्यासाठी ताब्यात घेण्याचा अधिकार देते. हा कायदा वागण्यापासून रोखू शकतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा कायदा सामान्यत: लागू केला जातो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App