विशेष प्रतिनिधी
लखनौ : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला) मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजुरी मिळाली. उत्तर प्रदेशात ही योजना आणखी पुढे चालूच राहणार आहे.अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूकांपूर्वीच राज्यातील गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली होती.Yogi Adityanath’s gift to the poor, poor welfare food scheme will be extended till March 2022
पंतप्रधान गरिब कल्याण योजनेंतर्गत देशातील जनतेला नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य देण्यात आले होते. योगी आदित्यनाथ यांनी मार्च महिन्यापर्यंत ही योजना सुरूच ठेवण्याचा निर्णय उत्तर प्रदेशमध्ये घेतला आहे. त्यानंतर, केंद्र सरकारनेही ही योजना मार्च महिन्यापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला होता.
त्यानुसार, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळत आहे. मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश कोरोना महामारीमुळे निर्माण होणारा ताण कमी करणे हा आहे.
आता, भाजपला 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालं असून युपीतही स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळेच, गरिबांसाठीची ही योजना यापुढेही उत्तर प्रदेशात सुरू राहणार आहे.केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत, भारतातील सुमारे 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना दरमहा 5 किलो अधिक धान्य(गहू-तांदूळ) दिले जाते.
देशातील ज्या नागरिकाकडे शिधापत्रिका उपलब्ध आहे, त्यांना या योजनेअंतर्गत दरमहा 5 किलो अतिरिक्त रेशन त्याच्या कोट्यातील रेशनसह मिळत आहे. पण, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App