विशेष प्रतिनिधी
गोरखपूर : उत्तर प्रदेशला पुढील पाच वर्षांत देशातील प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविणार असल्याचा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.गोरखपूर येथे १३० कोटी रुपयांचा निधी खर्च करूा उभारण्यात येत असलेल्या २१ प्रकल्पांचे भूमिपूजन योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाले.Yogi Adityanath believes that Uttar Pradesh will become the number one economy in the next five years
त्याचबरोबर ३२ कोटी रुपये निधी खर्च करून उभारण्यात येत असलेल्या ५० प्रकल्पांचे भूमिपूजनही यावेळी झाले. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, २०१७ पूर्वी गुंतवणुकीसाठी उत्तर प्रदेशचे नाव ऐकल्यावर लोक हसायचे. मात्र, आम्ही गेल्या साडेचार वर्षांत उत्तर प्रदेशची ही नकारात्मक प्रतिमा बदलली आहे.
२०१६ मध्ये उत्तर प्रदेश अर्थव्यवस्थेच्या आकारात देशात सहाव्या क्रमांकावर होता.मात्र, २०१७ मध्ये भाजपा सत्तेवर आल्यावर उत्तर प्रदेशात विकासाचा दर वाढला आहें. २०२० मध्ये उत्तर प्रदेश देशातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेले राज्य बनले आहे.
आगामी पाच वर्षांत पारदर्शक गुंतवणूक यंत्रणेच्या माध्यामतून आम्ही उत्तर प्रदेशला देशातील पहिल्या क्रमांकाची अथॅव्यवस्था बनवू.योगी आदित्यनाथ म्हणाले, २०१६ मध्ये व्यवसाय सुलभतेत (इज ऑफ डूर्इंग बिझनेस) उत्तर प्रदेश देशात १६ व्या क्रमांकावर होता. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात सुधारणा झाली आहे.
आता व्यवसाय सुलभतेत उत्तर प्रदेश देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. माझा विश्वास आहे की लवकरच उत्तर प्रदेश व्यवसाय सुलभतेत पहिल्या क्रमांकावर येईल. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि प्रकल्प उत्तर प्रदेशात येत आहेत.
त्यामुळे रोजगाराचीही निर्मिती झाली आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य हे बेरोजगारीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर जाईल. अनेक आव्हानांचा मुकाबला करून आम्ही विकासाचे हे चक्र सुरू केले आहे. त्याला थांबू दिले जाणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App