विशेष प्रतिनिधी
बंगळूर – कर्नाटक उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, त्यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, माजी मंत्री एस. टी. सोमशेखर आणि एक आयएएस अधिकारी यांना गृहनिर्माण प्रकल्पात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली नोटीस बजावली आहे.Yediyurappa will get notice by court
न्यायमूर्ती एस. सुनील दत्त यादव यांच्या खंडपीठाने टी. जे. अब्राहम या कार्यकर्त्याच्या याचिकेवर त्यांना नोटीस बजावली. येडियुरप्पा आणि सोमशेखर यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी न मिळाल्याने विशेष न्यायालयाने हे प्रकरण फेटाळले होते.
त्या वेळी येडीयुरप्पा मुख्यमंत्री होते. कर्नाटक विधानसभेत या विषयावर चर्चाही झाली होती. जेव्हा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आणि गंभीर आरोप केले. येडियुराप्पा आणि त्यांच्या मुलाने या प्रकरणामध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत आरोप फेटाळले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App