YAAS Cyclone Updates : भारतीय हवामान खात्याने (IMD) मंगळवारी अंदाज व्यक्त केला आहे की, चक्रिवादळ ‘यास’ येत्या 12 तासांत ‘अत्यंत भीषण चक्रीवादळात’ बदलेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर हे चक्रीवादळ मागच्या सहा तासांत 9 किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेने सरकले होते, ते 24 मे रोजी यूटीसीवर केंद्रित होते. YAAS Cyclone Updates, Yaas Cyclone To Intensify into Very Severe Cyclonic Storm in Next 12 Hours Says IMD
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने (IMD) मंगळवारी अंदाज व्यक्त केला आहे की, चक्रिवादळ ‘यास’ येत्या 12 तासांत ‘अत्यंत भीषण चक्रीवादळात’ बदलेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर हे चक्रीवादळ मागच्या सहा तासांत 9 किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेने सरकले होते, ते 24 मे रोजी यूटीसीवर केंद्रित होते.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने वाटचाल करत राहील आणि आणखी बरेच वेगवान होईल. 26 मे रोजी सकाळी ते ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याजवळ पोहोचेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 26 मे रोजी दुपारी बालासोरजवळील पारादीप आणि सागर बेट ओलांडून ‘अत्यंत भीषण वादळात रूपांतरित होईल. सिस्टम सेंटरवर याची गती ताशी सुमारे 55 ते 65 किलोमीटर आहे. यादरम्यान, समुद्रातील स्थितीही धोकादायक पातळीवर जाऊ शकते.
SCS ‘Yaas’ lay centred at 0530 hrs IST of today, about 320km SSE of Paradip, 430km SSE of Balasore, likely to move north-northwestwards, to cross north Odisha coast during noon of 26th May as a VSCS. pic.twitter.com/SV33nLgG8Z — India Meteorological Department (@Indiametdept) May 25, 2021
SCS ‘Yaas’ lay centred at 0530 hrs IST of today, about 320km SSE of Paradip, 430km SSE of Balasore, likely to move north-northwestwards, to cross north Odisha coast during noon of 26th May as a VSCS. pic.twitter.com/SV33nLgG8Z
— India Meteorological Department (@Indiametdept) May 25, 2021
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सोमवारी केंद्र सरकारला माहिती दिली की, बालासोरजवळ 26 मे रोजी धडकणाऱ्या ‘यास’ या वादळाचा सामना करण्यासाठी राज्य सज्ज आहे. चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चेदरम्यान पटनायक यांनी हे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगितले की, “आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि आमचे अधिकारी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. आम्ही आपल्याला आवश्यक गोष्टींबद्दल माहिती देऊ.”
केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, “मी सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी, विविध रुग्णालयांमध्ये वीज बॅकअपची व्यवस्था आणि राज्यातील ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पांमध्ये सुरक्षिततेच्या सूचना दिल्या आहेत.” दरम्यान, ओडिशा सरकारने सखल भाग आणि बालासोर, भद्रक, केंद्रपारा आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांमधून तब्बल एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका जास्त आहे.
YAAS Cyclone Updates, Yaas Cyclone To Intensify into Very Severe Cyclonic Storm in Next 12 Hours Says IMD
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App