विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गांधी हत्येचा फायदा नेहरूंना झाला पण हिंदुत्ववादी शक्तींचे नुकसान झाले.गांधी हत्येनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भावाला दगडाने ठेचून मारण्यात आले असे लेखक रतन शारदा यांनी सांगितले.Writer Ratan Sharda alleges that pro-Hindu forces suffered losses due to Gandhi assassination, while Nehru benefited
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील काही शक्ती सावरकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. याच कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की गांधीजीनी सूचना केल्यामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दयेचा अर्ज केला होता.
यामुळे सध्या देशभर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एक टीव्ही चर्चेत बोलताना लेखक रतन शारदा म्हणाले की, गांधी हत्येच्या आरोपातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. कपूर कमिशनच्या रिपोर्टमध्ये सावरकर यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झाला नव्हता.
सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तीनीही सावरकर यांना निर्दोष मुक्त केले होते. पण गांधी हत्येनंतर झालेल्या हिंसाचारात सावरकर यांच्या बंधुना दगडाने ठेचून मारण्यात आले. गांधी हत्येमुळे हिंदुत्ववादी शक्तींचे नुकसान झाले. पण त्याचा फायदा पंडित जवाहरलाल नेहरू यांना झाला.मदनलाल पहवा यांच्या सुचनेनंतरही गांधीजींना सुरक्षा का देण्यात आली नाही? त्यांना रुग्णालयात का नेण्यात आले नाही माहीत नाही, असा सवालही रतन शारदा यांनी केला..
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App