विशेष प्रतिनिधी
दिल्ली : आयआयटी रुरकी आणि इस्रोने जागतिक अंतराळ सप्ताह 2021 साजरा करण्यासाठी एकत्र येऊन काही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञाना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी जागतिक अंतराळ सप्ताह 2021 साजरा केला जाणार आहे. 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर यां काळात हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. या सप्ताहामध्ये जागतिक व्याख्यान मालिका आयोजित करण्यात आली आहे.
World Space Week 2021: IIT Roorkee collaborates with ISRO to commemorate
या वर्षी जागतिक अंतराळ सप्ताहाची थीम आहे, ‘अंतराळातील महिला’. 6 ते 9 ऑक्टोबर 2021 या काळात व्याख्यानांची मालिका आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याख्याने प्रख्यात प्राध्यापकांद्वारे दिली जातील. एरोस्पेस सिस्टीम, स्पेस टेक्नॉलॉजी या विषयावर प्रकाश टाकून भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या कामकाजाला प्रोत्साहन दिले जाईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक अजित चतुर्वेदी, संचालक, IIT रुरकी यांच्या हस्ते झाले आहे.
सॅनिटायझर सारखेच आता खिशात नेऊ शकाल ऑक्सीजन, IIT कानपूरच्या माजी विद्यार्थ्यांनी बनवली ही खास बॉटल
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात “भारतीय अंतराळ कार्यक्रम-एक यशोगाथा” य विषयावरील व्याख्यांने असतील. तर दुसरे सत्र “एरोस्पेस सिस्टमची गुणवत्ता आणि विश्वसनीयता” वर आधारित असेल आणि तिसरे सत्र “स्पेस सायन्स मिशन” वर आधारित असेल.
डॉ गीता एस, प्रोग्राम डायरेक्टर, स्पेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टम, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, व्हीएसएससी, तिरुअनंतपुरम, श्रीमती. अथुला देवी, उपसंचालक, VSSC, तिरुअनंतपुरम, श्रीमती. निगार शाजी, प्रकल्प संचालक, आदित्य -एल 1 मिशन, यूआर राव उपग्रह केंद्र, यूआरएससी, बेंगळुरू, श्रीमती. श्रीलाथा पी, प्रमुख, एचआरडीडी, व्हीएसएससी, तिरुअनंतपुरम यांची लेक्चर्स ह्या कार्यक्रमा अंतर्गत आयोजित करण्यात आली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App