विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : वर्ल्ड कप क्रिकेट च्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार पण अस्थिर खेळ करत विराट कोहली वगळता भारताची टॉप ऑर्डर तंबूत परतली आहे. कारण शुभमन गिल, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर तंबूत परतले आहेत. यातल्या फक्त रोहित शर्मा ने 47 धावांची चमकदार खेळी केली, पण ग्लेन मॅक्सवेलला मारलेल्या उत्तुंग षटकारापाठोपाठ सलग दुसरा चौकार मारताना तो झेलबाद झाला.
त्याआधी मिचेल स्टार्कने शुभमन गिलला किरकोळीत घरी पाठवले. सारा तेंडुलकर स्टेडियम मध्ये हजर असताना तिच्यासमोर शुभमन फक्त 4 रन्स करू शकला. श्रेयस अय्यरने देखील त्याचाच कित्ता गिरविला रोहित शर्मा बाद झाल्यानंतर श्रेयस मैदानावर आला. पहिल्याच बॉलला त्याने चौकार मारला आणि दुसऱ्या बॉलला विकेट कीपर कडे झेल देऊन तो घरी परतला.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी चांगली जमली होती. दोघांनी 57 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पेट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारून भारताला फलंदाजी दिली त्याचा हा निर्णय भारतीय फलंदाजांच्या टॉप ऑर्डरने आत्मघातकी फलंदाजी करून सार्थ ठरविला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या स्पेस अटॅक पेक्षा भारतीय टॉप ऑर्डरच्या चुकांमुळे भारतीय फलंदाज तंबूत परतले त्यांना पुरेसा संयमी खेळ करता आला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App