विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात मंगळवारी दहीहंडी उत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा होत असताना या उत्सवावर बदलापूर येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद उमटले. महिला गोविंदा ( govinda) पथकाने यासंदर्भात बॅनर झळकवून हजारो लोकांचे लक्ष वेधले.
मुंबईत झळकले महिला गोविंदाकडून बॅनर
भाजपचे वडाळा मतदार संघाचे आमदार कालीदास कोळंबकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीत महिला गोविंदांनी पोस्टर दाखवली. “अजून किती विरोध, मेणबत्ती जाळून कारायचा, पण नराधमाला कधी जाळायचा??” असे बॅनर या गोविंदानी झळकवले.
वरळी कोळीवाड्यात ठाकरे गटाने दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी गोविंदा पथकाकडून थर रचायला सुरूवात करणार एवढयात अँब्युलस आली. त्यावेळी गोविंदानी सामाजिक भान दाखवत अँब्युलसला जाण्यासाठी जागा करून दिली.
जळगावात काळ्या कारनाम्यांची दहीहंडी
जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने महायुतीच्या कथित काळ्या कारनाम्यांची आशयाची दहीहंडी फोडली. महायुतीच्या सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यावरूनही महायुती सरकारवर टीका करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला. वेगवेगळ्या घटनांची बॅनर आणि हातात काळे फुगे घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी दहीहंडी फोडण्यात येवून निषेध व्यक्त करण्यात आला.
कोल्हापुरात निषेध
दहीहंडीचा मुहूर्त साधत कोल्हापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला. कोल्हापुरात महायुतीच्या सरकार विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोखं आंदोलन करत सर्वांचं लक्ष वेधले. महायुतीचे काळे कारनामे या आशयाचा पेपर प्रसिद्ध करून त्याचे वाटप कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आले. त्यामध्ये महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये केलेल्या कामाचा काळ्या कामांचा पंचनामा करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आणि शहराध्यक्ष आर.के. पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा पंचनामा करत हे आंदोलन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App