विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: एका शिख समुदायातील एक विवाहित महिला गुरूनानक जयंतीनिमित्त पाकिस्तानला गेली आणि मुस्लिम धर्म स्वीकारून पाकिस्तान्याशी लग्न करून आली. विशेष म्हणजे लग्नाच्या वेळी या महिलेचा पतीही उपस्थित होता.Woman went to Pakistan and converted to Islam and married a Pakistani
मुळ कोलकाताची असलेली ही महिला आपल्या पतीसोबत पाकिस्तानात गुरुनानक जयंती साजरी करण्यासाठी गेली होती. तेव्हा तिथे तिने एका मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केले. गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर 17 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या महिलेनं अटारी बॉर्डरवरुन पाकिस्तानात प्रवेश केला.
त्यानंतर 24 नोव्हेंबरला तिने मोहम्मद इम्रान या व्यक्तीसोबत लग्न केलं. या मुस्लीम वक्तीशी लग्न करण्यापूर्वी तिने मुस्लीम धर्मही स्वीकारला. त्यासाठी लाहोर न्यायालयात याचिका दाखल केली आणि परवीना सुलतान असे तिचं नाव ठेवण्यात आलं.
या महिलेनं पाकिस्तानात मुस्लीम व्यक्तीशी लग्न केलं असलं तरी ती पाकिस्तानमध्ये राहू शकली नाही. तिला भारतात परत पाठवण्यात आले. 26 नोव्हेंबरला वाघा-अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवर शीख जथ्यासह ती भारतात परत आली. संबंधित महिला आणि तिचा भारतीय पती मूकबधिर आहेत आणि मुहम्मद इम्रान हा तिचा पाकिस्तानी पती देखील मूकबधिर आहे.
ही महिला सोशल मीडियावर मुहम्मद इम्रानच्या संपर्कात होती. तिच्या पतीलाही ही माहिती होती. पाकिस्तानात पोहचून तिने जस्टिस ऑफ पीसच्या कार्यालयात याचिका दाखल केली आणि तिच्या भारतीय शीख नवऱ्याच्या उपस्थितीत तिने इम्रानशी लग्न केले.
तिने नंतर स्वत:ला परवीन सुलताना असं नाव दिल. मोहम्मद इम्रान हा पाकिस्तानी पंजाबमधील राजनपूरचा रहिवासी आहे. 23 नोव्हेंबर रोजी तिने तिच्या भारतीय पतीला घटस्फोट दिला आणि इम्रानसोबत तिचा निकाह पार पडला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App