मतांसाठी वाट्टेत ते, पंजाबच्या कॉँग्रेसी मुख्यमंत्र्यांना हिंदूत्वाचा पुळका, महाभारतावर पीएचडी, ब्राम्हण भलाई मंडळाची स्थापना होणार, परशुरामांचे तपोस्थलही उभारणार


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांसाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदूत्वाचा पुळका आल्याचे दाखवित अनेक घोषणा केल्या आहेत. ते स्वत: महाभारतावर पीएचडी करणार आहेत. त्याचबरोबर रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेच्या अभ्यासासाठी संशोधन केंद्रेही उभारणार आहेत. ब्राम्हण समाजालाही त्यांनी चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.In the run-up to the polls, the Congress chief minister of Punjab will be given a hug of Hindutva, a PhD on the Mahabharata, a Brahmin Welfare Board will be set up, and a shrine to Parashuram will also be set up.

राज्यातील भटक्या गुरांची काळजी घेण्याची जबाबदारी ब्राह्मण कल्याण मंडळाकडे सोपवली जाईल आणि त्यासाठी सरकार मंडळाला निधी उपलब्ध करून देईल, असे त्यांनी सांगितले.पंजाब विद्यापीठातील भगवान परशुराम चेअरसाठी 2 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद जाहीर केली. रामायण, महाभारत आणि भगवदगीतेवरील नवीन संशोधन केंद्र मानवतेसाठी जीवन आणि प्रेरणास्थान बनेल असे सांगून चन्नी म्हणाले,



मला एका अतिशय ज्ञानी आणि विद्वान माणसाने माझे जीवन अर्थपूर्ण आणि धार्मिक बनवण्यासाठी भगवद्गीतेचा एक श्लोक दररोज शिकण्यास सांगितले होते. गीता उपदेश अतुलनीय आहे. माझी सध्याची पीएचडी तीन महिन्यांत पूर्ण होईल. मग मी संस्कृत शिकायला सुरुवात करेन आणि महाभारतावर पीएचडी करेले. हे संशोधन केंद्र या महाकाव्यांचा संदेश लोकांपर्यंत सोप्या स्वरूपात पोहोचवण्यासाठी काम करेल.

राज्य सरकार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आदरणीय शंकराचार्यजींना जोडण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकार भगवान परशुरामजींच्या तपोस्थानाचा अत्याधुनिक वास्तुशिल्प म्हणून विकास करणार आहे. 10 कोटी रुपयांचा धनादेश यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला असून, त्यादृष्टीने अधिक निधीची गरज भासेल, असे त्यांनी सांगितले. भगवान परशुरामजींच्या माता रेणुका जी यांच्याशी संबंधित असलेल्या जागेच्या विकासासाठी ७५ लाख रुपये खर्च केले जातील.

महाभारताचा दाखला देत अकाली दलावर टीका करताना चन्नी म्हणाले, राजा धृतराष्ट्राच्या पुत्रमोहामुळे कौरवांचा नाश झाला. त्याचप्रमाणे अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांचा मुलगा सुखबीर बादल यांच्यावरील पक्षाच्या प्रेमामुळे शिरोमणी अकाली दल (एसएडी) डळमळीत झाला होता. महाभारत हा राज्यशास्त्रावरील ग्रंथ आहे आणि आजही तो प्रासंगिक आहे आणि अकाली दलाची खराब परिस्थिती हे त्याचे उदाहरण आहे.

ब्राम्हण समाजाला चुचकारताना ते म्हणाले, भगवान परशुराम यांचे जीवन आणि तत्वज्ञान आपल्याला जात, धर्म, व्यवसाय कोणताही असो, अन्यायाविरुद्ध सर्वशक्तीनिशी लढले पाहिजे हे शिकवितो. सामान्य माणसाला सत्ता देणे हे भगवान परशुरामांच्या शिकवणुकीचे मूळ तत्व आहे. ब्राह्मण समाजाशी आपले पूर्वीपासूनच भावनिक नाते आहे.

आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना राज्याविषयी कमी माहिती असल्याचे फटकारत चन्नी म्हणाले, केजरीवाल हे बाहेरचे असण्यासोबतच अफवा पसरवणारे आहेत. त्यांना राज्याबद्दल काहीही माहिती नाही. परंतु त्यांना प्रत्येक गोष्टीत स्वत:चे घोडे पुढे दामटायचे आहे. अशा प्रकारचे स्वस्त राजकारण राज्यात कधीही यशस्वी होणार नाही.

In the run-up to the polls, the Congress chief minister of Punjab will be given a hug of Hindutva, a PhD on the Mahabharata, a Brahmin Welfare Board will be set up, and a shrine to Parashuram will also be set up.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात