Vinayak Raut : विनायक राऊतांवर सूनेचे जादूटोण्याचे गंभीर आरोप; राऊतांचा पलटवार; माझ्या बदनामीचे षडयंत्र, 12.50 कोटींची मागणी!

Vinayak Raut

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Vinayak Raut  शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबात सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पती गितेश राऊत, सासरे विनायक राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर कौटुंबिक छळ आणि जादूटोणा केल्याचे गंभीर आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपांवर विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “हे माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र असून, सुनेने तडजोडीसाठी साडेबारा कोटी रुपयांची आणि इतर महागड्या वस्तूंची मागणी केली आहे,” असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे.Vinayak Raut

सून गिरीजा राऊत यांचे गंभीर आणि हादरवणारे आरोप

गिरीजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार…

शारीरिक आणि मानसिक छळ: लग्नानंतर हनीमूनला ऊटी येथे गेले असताना पती गितेशने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. “शारीरिक संबंध लग्नात महत्त्वाचे नाहीत, मला त्याचा कंटाळा येतो,” असे त्याने सांगितले.Vinayak Raut



अपमान आणि मारहाण: पालीच्या गणपती मंदिरात आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पतीने गर्दीत आणि मित्रांसमोर अत्यंत गलिच्छ भाषेत अपमानित केले. शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यावर “तू मला हात लावशील तर विधवा होशील,” अशी धमकी देत मारहाण केली आणि उपाशी ठेवले.

अघोरी उपाय आणि भोंदूबाबांचा वापर: पती गितेश शारीरिक संबंध ठेवण्यास अक्षम असल्याने, कुटुंबाने जादूटोणा आणि अघोरी उपाय केले. एका भोंदूबाबाकडे नेऊन जबरदस्तीने काहीतरी पाजण्याचा प्रयत्न केला आणि केसही कापले, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.

या तक्रारीनंतर पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अघोरी कृत्य प्रकरणी ‘भोंदूबाबा’ फिरोज शेख याला अटक करून दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. इतर दोन भोंदूबाबा फरार आहेत.

विनायक राऊतांचा पलटवार आणि स्पष्टीकरण:

विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सुनेचे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “सुनेच्या म्हणण्यानुसार, 2018 ते 2022 दरम्यान हे प्रकार घडले आणि त्यावेळी तिचे आई-वडील नेहमी सोबत असायचे. मग जर तिच्यावर असा जबरदस्तीने जादूटोणा होत होता, तर त्यावेळी सज्ञान असलेल्या आई-वडिलांनी त्वरित पोलिसांत तक्रार का केली नाही? 4 वर्षांनंतर आताच त्यांना तक्रार का करावीशी वाटली?”

“29 डिसेंबर 2023 रोजी ती स्वतःहून माहेरी गेली. जाताना तिने 10 ते 12 बॅगा भरून आपले सगळे कपडे आणि ‘स्त्रीधन’ सोबत नेले. डॉक्टरांनी सांगितल्याचे कारण देत तिने घर सोडले. आम्ही तिला एक शब्दही विचारला नाही की ती काय घेऊन चालली आहे.”

12.50 कोटींची मागणी

“सध्या त्यांचा घटस्फोटाचा दावा सुरू आहे. तडजोडीसाठी सुरुवातीला 5 कोटी रुपये, मध्यस्थासाठी 2 कोटी, 3 बीएचके फ्लॅट ठाणे किंवा बोरिवलीत आणि 20 लाखांपेक्षा कमी नसलेली ऑटोमॅटिक कार अशी मागणी केली होती. आम्ही नकार दिल्यावर, आता 12.50 कोटी रुपये, दरमहा 5 लाख रुपये देखभाल खर्च, 1 लाख रुपये भाडे आणि मुलाच्या घरावर असलेले कर्ज आम्हीच भरायचे, अशा अवाढव्य मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठीच तिने हे खोटे आरोप केले आहेत.”

जादूटोण्याचे खंडन

“आम्ही आध्यात्मिक लोक आहोत. आमचे दैवत पंढरीचा पांडुरंग आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. आम्हाला कोणत्याही भोंदूबाबाकडे जाण्याची गरज नाही. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आणि ग्रामदेवतेचे दर्शन घेणे गुन्हा नाही.”

अटकपूर्व जामीन आणि राजकीय षडयंत्राचा आरोप

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर 23 जुलै रोजी सुनावणी होणार असून तोपर्यंत पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जाणार नाही.

राऊत यांनी शेवटी म्हटले आहे की, “यामागे मोठे राजकीय षडयंत्र आहे आणि त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी संबंधित आहे, हे मी लवकरच सांगेन. गेल्याच महिन्यात माझे पोलीस संरक्षणही काढून घेण्यात आले आहे. पण माझा पोलिसांच्या तपासावर आणि न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही यातून सहीसलामत बाहेर पडू.”

विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या गंभीर आरोपांमुळे आणि त्यानंतर राऊत यांनी उघड केलेल्या पैशांच्या मागणीमुळे हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे आणि राजकीय वळण घेणारे ठरत आहे. आता पोलीस तपास आणि 23 जुलैच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Black Magic & ₹12.50 Cr Extortion: Vinayak Raut Slams Daughter-in-Law’s Allegations

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात