नाशिक : पराभूतांना चाहूल देतो भविष्यातल्या (अ)भाग्याची!!… राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतले विरोधकांचे सर्वसहमतीचे उमेदवार वर उल्लेख केलेले गीत म्हणत असतील!! withdraw my name from consideration as a possible joint opposition candidate for the President of India
त्यामुळेच ते एकापाठोपाठ एक राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माघार घेताना दिसत आहेत. आधी सर्व विरोधकांच्या सहमतीचे सर्वप्रथम उमेदवार शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि आज जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपतीपदाच्या संभाव्य उमेदवारी पासून माघार घेतली आहे. जम्मू – काश्मीरमध्ये सध्या प्रचंड राजकीय अस्वस्थता आहे. त्या राज्याला माझ्या सेवेची गरज आहे. माझ्या पुढे भविष्यातले सक्रिय राजकारण वाढून ठेवलेले दिसते आहे. त्यामुळे मी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी माघार घेतो आहे, असे वक्तव्य डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी केले आहे.
*राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून स्वतःहून माघार घेणारे शरद पवार 82 वर्षांचे आहेत, तर डॉक्टर फारुख अब्दुल्ला 84 वर्षांचे आहेत.
या दोन्ही नेत्यांच्या राजकीय वाटचालीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असे की, त्यांना अजूनही भविष्यातले आपले सक्रीय राजकारण पुढे वाढून ठेवलेले दिसत आहे आणि म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, असे या दोघांनीही उघडपणे म्हटले आहे.
परंतु खरंच ही वस्तुस्थिती आहे का?? हे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या आकडेवारीवरून अधिक स्पष्ट होईल!!
राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार काय किंवा डॉ. फारुख अब्दुल्ला काय विरोधी पक्षांच्या कोणत्याही उमेदवाराने कोणतीही, कितीही आकडेवारी जुळवाजुळव केली… बेरीज – वजाबाकी – गुणाकार – भागाकार – लसावि – मसावि – साइन – कॉस – थिटा काढले तरी विरोधकांचे सर्वसंमतीचे उमेदवार म्हणून हे दोघेही राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत यशस्वी होऊ शकणार नाहीत!!
मग राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत 100% पराभवच पुढे वाढून ठेवला आहे ती निवडणूक लढवायची कशाला?? असा “राजकीय पोक्त” विचार या दोन्ही नेत्यांनी करून विरोधकांच्या सर्वसंमतीच्या उमेदवारीतून माघार घेतली असल्यास नवल ते काय??
मात्र ही माघार घेताना पवार आणि अब्दुल्ला या दोन्ही नेत्यांनी माघारीला आपल्या भविष्यातल्या सक्रीय राजकारणाचा मुलामा चढवला आहे!! त्याच वेळी आपले नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचविणाऱ्या सर्व विरोधी पक्षांचे या दोन्ही नेत्यांनी आवर्जून आभार मानले आहेत. आभार मानताना या नेत्यांनी कुठेही कुचराई केलेली नाही!!
I withdraw my name from consideration as a possible joint opposition candidate for the President of India. I believe that Jammu & Kashmir is passing through a critical juncture & my efforts are required to help navigate these uncertain times: NC chief Farooq Abdullah (File pic) pic.twitter.com/yPyJNqmi1P — ANI (@ANI) June 18, 2022
I withdraw my name from consideration as a possible joint opposition candidate for the President of India. I believe that Jammu & Kashmir is passing through a critical juncture & my efforts are required to help navigate these uncertain times: NC chief Farooq Abdullah
(File pic) pic.twitter.com/yPyJNqmi1P
— ANI (@ANI) June 18, 2022
– वाटचाल समांतर, पवारांचे ध्येय अधांतर!!
शरद पवार आणि डॉ. फारुख अब्दुल्ला यांची राजकीय वाटचाल एकमेकांना पूरक आणि समांतर राहिली असली तरी त्याची अखेर मात्र थोडीशी वेगळी आहे. डॉ. फारूक अब्दुल्ला हे आपले चिरंजीव ओमर अब्दुल्ला यांना जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर बसू शकलेत, तेही 370 कलम अस्तित्वात असताना आणि जम्मू -“काश्मीर ला लडाखसह स्वतंत्र राज्याचा दर्जा असताना!!
– डॉ. अब्दुलांचे कौशल्य पवारांकडे नाही
पण तेवढे राजकीय कौशल्य आणि क्षमता शरद पवारांना अद्याप तरी खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत महाराष्ट्रात दाखवता आलेले नाही. पवारांना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवण्याचे देखील जमलेले नाही. दोन्ही नेत्यांच्या सक्रिय राजकारणाचा भविष्यातला भाग आपापल्या राजकीय वारसांची योग्य “फिटमेंट” हाच आहे!! त्यात डॉ. फारूक अब्दुल्ला आधी यशस्वी झाले आहेत. पवार अद्याप यशस्वी झालेले नाहीत. भविष्यातल्या त्यांच्या सक्रीय राजकीय भूमिकेत नेमके काय वाढून ठेवले आहे??, हे माहिती नाही
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App