विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात नोकºया कमी झाल्या होत्या. मात्र, आता परिस्थिती सुधारली असून नोकºयांची संख्या वाढली आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०२१ मध्ये १२.७३ लाख सदस्यांची वाढ झाली आहे.With the return of jobs, the number of employees increased by 10.22 per cent over the previous year
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यात वेतनपटात सुमारे १०.२२ टक्के इतकी वाढ झाली.ऑक्टोबर २०२१ मध्ये नव्याने दाखल झालेल्या १२.७३ लाख सदस्यांपैकी ७.५७ लाख सदस्य कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आणि संकीर्ण तरतुदींचा कायदा, १९५२ या अन्तर्गत प्रथमच नोंदले गेले आहेत.
जवळपास ५.१६ लाख सदस्य बाहेर पडून परतले आहेत. वेतनपटाच्या आकडेवारीची वयानुसार तुलना करता २२ ते २५ वर्षे वयोगटाने सर्वाधिक निव्वळ नोंदणी केली असून आॅक्टोबरमध्ये ३.३७ लाख सदस्यांची भर घातली.
१८-२१ वर्षे वयोगटानेही अंदाजे २.५० लाख नोंदण्यांची लक्षणीय भर घातली आहे. १८-२५ च्या वयोगटांनी या आॅक्टोबरमध्ये एकूण अंदाजे ४६.१२ टक्के सदस्यांची निव्वळ भर घातली आहे. या वयोगटांचे सदस्य सामान्यपणे नव्याने रोजगार मिळवू लागलेले असतात आणि व्यक्तिगत कमाईच्या दृष्टीने महत्त्वाच्या टप्प्यावर असतात.
वेतनपटाच्या आकडेवारीची राज्यनिहाय तुलना करता, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमधील आस्थापना आघाडीवर असून त्यांनी ऑक्टोबरमध्ये अंदाजे ७.७२ लाख सदस्यांची भर घातली आहे. एकूण बघता हे प्रमाण ६०.६४ % इतके आहे. ऑक्टोबरमध्ये महिलांच्या नोंदणीची संख्या २.६९ लाख इतकी होती. एकूण निव्वळ भर बघता, महिला नोंदणीचा वाटा सुमारे २१.१४% होता.
उद्योगनिहाय पाहता ‘तज्ञ सेवा’ श्रेणी (मनुष्यबळ संस्था, सुरक्षाव्यवस्था पुरविणाऱ्या खासगी संस्था, लहान कंत्राटदार इ.) चा वाटा ४०.७३% इतका आहे. याखेरीज कागद उद्योग, भातगिरण्या, अशा आस्थापनांमध्ये वेतनपटात निव्वळ भर पडण्याचा कल वाढत चालल्याचे दिसून येते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App