वृत्तसंस्था
नवी दिल्ली :Parliament 18व्या लोकसभेचे पहिले हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी ही माहिती दिली. हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.Parliament
त्यात वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयकासह अनेक विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्तावही मंजूर केला जाऊ शकतो.
18 व्या लोकसभेचे पहिले पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान चालले. सुमारे 115 तास चाललेल्या संपूर्ण अधिवेशनात एकूण 15 बैठका झाल्या. अधिवेशनादरम्यान सभागृहाची उत्पादकता 136% होती.
याच अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी सभागृहात 2024-2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. एकूण 27 तास 19 मिनिटे ही चर्चा चालली, त्यात 181 सदस्यांनी भाग घेतला. अधिवेशनात एकूण 65 खासगी सदस्य विधेयकेही मांडण्यात आली.
याशिवाय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, या अधिवेशनादरम्यान देशाच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन, पूर आणि जीवित व वित्तहानी यावरही चर्चा झाली. ऑलिम्पिकसाठी भारताच्या तयारीवरही चर्चा झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App