विशेष प्रतिनिधी
हरयाणा : AICTE मार्फत हरियाणामधील तीन इंजिनीअरिंग कॉलेजेसना बी टेक कोर्स हिंदी भाषेमध्ये घेण्याची परवानगी दिली आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत हे इनिशिएटिव्ह घेण्यात आले आहे.
Will you get engineering education in Marathi now?
एआयसीटीईचे चेअरमन अनिल सहस्रबुद्धे यांनी एज्युकेशन टाइम्स सोबत बोलताना म्हटले, तमिळ तेलुगू मराठी बंगाली आणि हिंदी भाषेमध्ये बीटेक कोर्स घेण्याची आम्ही परवानगी दिली आहे. 25 जुलै 2021 पासून हे कोर्सेस संबधित युनिव्हर्सिटीच्या अप्रूवलने रिजनल लँग्वेजमध्ये घेण्यास सुरूवात करू शकतात. पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत असणार्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजने इंजिनीअरिंग कोर्सेस मराठी भाषेत घेण्याची परमिशन मिळवली आहे.
ही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत?
हा इनिशिएटिव्ह सुरू करण्याचा उद्देश असा, ज्यांचे शालेय शिक्षण रिजनल भाषेमध्ये झालेले आहे, त्यांना इंजिनीअरिंग शिक्षण घेताना भाषेचा अडथळा येऊ नये हा आहे.
हरयाणामधील गुरु जंभेश्वर युनिव्हर्सिटीचे डीन हरभजन बन्सल यांनी सांगितले की, या संबंधीची प्रोसेस एका ठराविक चर्चेनंतर फायनल करण्यात येईल. इंजिनीयरिंगचे जे बुक्स सध्या मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत, त्यांच्या लेखकांची पर्मिशन घेऊन त्या बुकचे ट्रान्सलेशन करण्याची प्रोसेस सुरू करण्यात येईल. हरयाणामध्ये या इनिशिएटिव्हचे स्वागतच झाले आहे. ही प्रोसेस चालू करण्यासाठी वेगळ्या क्लासरूम्स, फॅकल्टी आणि नॉन टेक्निकल स्टाफ हायर करणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App