मॅजिक ऑफ 99 चा प्रभाव; घटनात्मक पदांमध्ये होणार का गांधी घराणेशाहीचा पुन्हा शिरकाव??

नाशिक : 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस 54 वरून 99 वर गेल्यामुळे मॅजिक ऑफ 99 चा प्रभाव निर्माण झाला आहे. पण या प्रभावातून घटनात्मक पदांमध्ये होणार का गांधी घराणेशाहीचा शिरकाव??, असा सवाल तयार झाला आहे. Will there be a re-entry of the Gandhi dynasty in constitutional positions?

2004 पासून गांधी घराणे कुठल्याही घटनात्मक पदावर आरूढ नाही. 2004 ते 2024 काँग्रेस आणि गांधी घराण्याचा प्रभाव भारतीय राजकारणावर घटला, पुन्हा वाढला पुन्हा घटला असा दोलायमान राहिला. पण 2004 मध्ये सोनिया गांधी यांची पंतप्रधान पदाची संधी गेल्यानंतर गांधी घराण्याने कोणत्याही घटनात्मक पदावर दावा सांगितला नाही. किंवा कोणत्याही घटनात्मक पदांमध्ये शिरकाव केला नाही.

2004 ते 2014 या कालावधीत सोनिया गांधी काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या होत्या. त्याचबरोबर त्या यूपीए सरकारने नेमलेल्या नॅशनल ॲडव्हाइसरी कौन्सिलच्या चेअरमन होत्या, पण या नॅशनल ॲडव्हायझरी कौन्सिल ला कुठलीही घटनात्मक अधिमान्यता नव्हती. त्यामुळे अगदी घटनात्मक पदच म्हटले, तर सोनिया गांधी फक्त काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या होत्या, त्या काळात लोकसभेत सुरुवातीला प्रणव मुखर्जी 2004 ते 2012 पर्यंत आणि ते 2012 मध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर सुशीलकुमार शिंदे 2012 ते 14 पर्यंत यांनी सभागृहाचे नेतृत्व केले. त्यामुळे अधिकृतरित्या सुरुवातीला प्रणव मुखर्जी आणि नंतर सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे लोकसभेतले नेते, तर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे राज्यसभेतले नेते राहिले. अर्थातच गांधी परिवाराकडे त्या काळात कुठलेही घटनात्मक पद नव्हते.

2014 ते 2024 या कालावधीत सोनिया गांधी या काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या होत्या, पण काँग्रेसकडे लोकसभेत एवढे संख्याबळच नव्हते की, त्यांचा कुठलाही नेता लोकसभेतले नेते वर अथवा अधिकृत विरोधी पक्षनेते पद स्वीकारू शकेल. त्यामुळे अर्थातच गांधी परिवारातील कोणालाही तेव्हा देखील घटनात्मक पद स्वीकारण्याची संधी मिळाली नाही.

2024 मध्ये मात्र काँग्रेसला लोकसभेच्या 99 जागा मिळाल्याने पक्षाकडे अधिकृतरित्या लोकसभेतले विरोधी पक्षनेते पद येऊ शकते. हे पद राहुल गांधींनी स्वीकारावे, अशी गळ काँग्रेसच्या नेत्यांनी घातली आहे. काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक दिल्लीतल्या अशोक हॉटेलमध्ये होत असताना काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावरती जमावडा करून त्यांना लोकसभेतले विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारण्याची गळ घातली. लोकसभेत समोर पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असताना राहुल गांधींसारखा तरुण प्रभावी विरोधी पक्ष नेता सरकारला जेरीस आणू शकेल, असा काँग्रेस नेत्यांचा होरा आहे.

काँग्रेस संसदीय पक्षाची सायंकाळी बैठक होत असून त्या बैठकीत काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधींची फेरनिवड, तर राहुल गांधींची लोकसभेतल्या नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे.या निमित्ताने काँग्रेस मधली गांधी घराणेशाही तब्बल 20 वर्षांनी अधिकृतरित्या घटनात्मक पदांवर प्रस्थापित होण्याची शक्यता आहे, म्हणजे एकीकडे सोनिया गांधी संसदीय पक्षाच्या नेत्या,तर दुसरीकडे राहुल गांधी हे लोकसभेतील काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते म्हणून विरोधी पक्षनेते ही पदे स्वीकारण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातत्याने काँग्रेस मधल्या गांधी घराण्यावर शाही परिवार असल्याची टीका केली होती. 2014 आणि 2019 च्या पराभवानंतर गांधी घराण्याने कटाक्षाने कुठल्याही मोठे पद स्वीकारण्यापासून आपल्याला दूर ठेवले होते. परंतु, आता काँग्रेसला 99 जागा मिळाल्याने काँग्रेस जणांचा हुरूप वाढला आहे. त्यातूनच त्यांनी गांधी घराण्याची गांधींची घराणेशाही घटनात्मक पदांवर पुनर्प्रस्थापित करण्याची घाई चालवल्याचे दिसून येत आहे.

Will there be a re-entry of the Gandhi dynasty in constitutional positions?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात