सुकेशने तुरुंगातून दिल्लीच्या उपराज्यपालांना आणि गृहमंत्रालयाला पत्र लिहून ही तक्रार केली होती.
विशेष प्रतिनिधी
‘आम आदमी पार्टी’चे संयोजक अरविंद केजरीवाल, सतेंद्र जैन आणि तिहारचे माजी डीजी यांच्याविरोधात तक्रार प्रकरणात महाठग सुकेश चंद्रशेखर याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सीबीआयने तुरुंगात जाऊन सुकेश चंद्रशेखरचा जबाब नोंदवला.
सीबीआयने तुरुंगात जाऊन सुकेशचा जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. तीस हजारी कोर्टाने यासाठी परवानगी दिली, त्यानंतर तपास यंत्रणेने कारागृहात जाऊन जबाब नोंदवला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआय लवकरच पुन्हा तुरुंगात जाऊन सुकेशचा जबाब नोंदवणार आहे.
सत्येंद्र जैन, अरविंद केजरीवाल आणि तिहारचे माजी डीजी संदीप गोयल यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचा दावा सुकेश चंद्रशेखर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. सुकेशने तुरुंगातून दिल्लीच्या उपराज्यपालांना आणि गृहमंत्रालयाला पत्र लिहून ही तक्रार केली होती. सुकेशच्या तक्रारीवरून उपराज्यापाल आणि गृह मंत्रालयाने चौकशीची परवानगी दिली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App