जाणून घ्या, माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी नेमके काय दिले आहे उत्तर
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आतिशी यांनी सोमवारी सांगितले की, आमचा पक्ष २०२७च्या गोवा आणि गुजरात विधानसभा निवडणुका काँग्रेसशी युती न करता एकट्याने लढवण्याची तयारीत आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री मडगाव येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी गोव्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी आतिशी म्हणाल्या, ‘आम्ही स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी करत आहोत. युतीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.
अतिशी म्हणाल्या की, गोव्यातील लोकांनी २०२२ मध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मतदान केले आणि त्याचकाळात काँग्रेसने ११ जागा जिंकल्या, परंतु त्यांचे ८ आमदार नंतर भाजपमध्ये सामील झाले. त्या म्हणाल्या की, काँग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष आहे ज्यांचे फक्त तीन आमदार आहेत आणि ‘आप’चे दोन आमदार आहेत.
आतिशी म्हणाल्या की, ‘जेव्हा २०२२ च्या निवडणुकीत दोन ‘आप’ उमेदवार जिंकले, तेव्हा अशा अफवा पसरल्या होत्या की ते दोन महिनेही पक्षात राहणार नाहीत, परंतु ते अजूनही पक्षासोबत आहेत कारण ते पैसे कमविण्यासाठी राजकारणात आलेले नाहीत.’
‘आप’ला समविचारी पक्षांशी युती करण्यास रस नाही का असे विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘जेव्हा ११ पैकी ८ आमदार भाजपमध्ये सामील होतात, तेव्हा समान विचारसरणी काय असते?’ ‘आप’ने दाखवून दिले आहे की आमचे दोन आमदार निवडून आले आणि ते अजूनही पक्षासोबत उभे आहेत. भाजपने आमच्या आमदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला
निवडणूक जिंकणे हे त्यांचे एकमेव ध्येय आहे.
त्या म्हणाल्या, ‘आम्हाला अशा राजकारणात रस नाही ज्यामध्ये निवडणुका जिंकणे आणि पैसे कमवणे हे एकमेव उद्दिष्ट आहे.’ राजकारणात आमचे हित लोकांसाठी काम करण्यात आहे.’ दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाबद्दल बोलताना आतिशी म्हणाल्या की, प्रश्न ‘आप’चे काय होईल हा नाही, तर दिल्लीतील लोकांचे काय होईल हा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App