#विक्रमलँडर चंद्रावर उतरला की त्याच्या आत असलेला #प्रग्यानरोव्हर चंद्रावर उतरवला जाईल, जो पुढच्या १५ दिवसांत त्याला नेमून दिलेले प्रयोग करेल आणि माहिती गोळा करेल… प्रग्यानचे काम १५ दिवसांपेक्षा जास्त चालणार नसल्याने, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर होणार्या १५-१५ दिवसांच्या (चांद्र) दिवस आणि (चांद्र) रात्रीचा उपयोग करून घेण्याचे ठरवले, आणि सलग १५ दिवस उपलब्ध होणारी सौर ऊर्जा वापरून प्रग्यान काम करू शकेल, अशी सोलर सिस्टिम त्याच्यासाठी तयार केली, आणि त्याप्रमाणे चांद्रमोहिमेचे टाईमटेबल बनवले… Why today was decided for the landing of Chandrayaan 3
आता चंद्रावर सलग १५ दिवसांचा ‘१ दिवस’ कसा असतो, ते आपण पाहू…
आपल्याला माहिती आहे, की चंद्राला स्वत:भोवती आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सारखाच कालावधी, म्हणजेच ३० दिवस लागतात. त्यामुळेच चंद्राची एकच बाजू आपल्याला कायम दिसत असते…
शेजारच्या आकृतीत सूर्य, पृथ्वी आणि चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या ४ मुख्य स्थिती दाखवल्या आहेत… आपण आत्ता असे समजू की केशरी ठिपका L (म्हणजेच लँडर) पृथ्वीच्या बरोबर समोर आहे… चंद्राची एकच बाजू पृथ्वीसमोर रहात असल्याने, L हा केशरी ठिपका कायम पृथ्वीच्या बरोबर समोरच रहाणार आहे…
आता आपण अमावास्येपासून (चंद्राची सगळ्यात उजवीकडची स्थिती, ज्यात चंद्राची सूर्यप्रकाश न पडलेली बाजू, जिकडे L आहे, ती बाजू पृथ्वीकडे आहे) कालमापन सुरू केले, तर ७.५ दिवसांनी चंद्र आकृतीत वरच्या बाजूला गेलेला असेल, जेव्हा चंद्राची उजवीकडची (सूर्याकडची) बाजू प्रकाशमान आणि डावीकडची अंधारी दिसून येईल (शुक्ल अष्टमी). तसेच पुढे अजून ७.५ दिवसांनी संपूर्ण चंद्राची चकती आपल्याला प्रकाशमान दिसेल (पौर्णिमा). तसेच पुढे अजून ७.५ दिवसांनी चंद्र आकृतीच्या खालच्या बाजूला आलेला दिसेल (कृष्ण अष्टमी), आणि त्यानंतरच्या ७.५ दिवसांनंतर म्हणजेच एकूण ३० दिवसांनंतर चंद्र परत सुरुवातीच्या स्थितीला (अमावस्या) पोचेल.
आता हेच चक्र लँडरचा केशरी ठिपका L डोळ्यांसमोर ठेवून कसे दिसेल ते पाहू… आमावस्येला L च्या ठिकाणी मध्यरात्र असेल… तिथून शुक्ल अष्टमीला L ह्या ठिकाणाहून सूर्य उगवतीच्या दिशेला क्षितिजावर आलेला दिसेल… इथून पुढचे ७.५ दिवस L ला सूर्य रोज थोडा थोडा वर आलेला दिसून, पौर्णिमेला सूर्य L च्या डोक्यावर आलेला दिसेल. म्हणजेच पौर्णिमेला चंद्रावरच्या L साठी ती मध्यान्ह असेल… तसेच पुढच्या ७.५ दिवसांनंतर (कृष्ण अष्टमी) L साठी सूर्य मावळतीच्या क्षितिजावर गेलेला दिसेल, आणि त्यानंतरच्या ७.५ दिवसांनंतर (अमावस्येला) L साठी परत मध्यरात्र असेल…
म्हणजेच L ह्या केशरी ठिपक्यासाठी, शुक्ल अष्टमीला सूर्य उगवतीच्या दिशेला उगवताना दिसायला लागेल, पौर्णिमेला तो डोक्यावर आलेला दिसेल, आणि कृष्ण अष्टमीला मावळतीच्या क्षितिजावर दिसेल…
ह्याचाच अर्थ, शुक्ल अष्टमी ते कृष्ण अष्टमी असे १५ दिवस L ह्या केशरी ठिपक्याला सूर्य कायम दिसत असणार आहे, म्हणजेच ते १५ दिवस चंद्रावर ‘दिवस’ असणार आहे, आणि त्याच्या पुढचे १५ दिवस – कृष्ण अष्टमी ते शुक्ल अष्टमी हे १५ दिवस – चंद्रावर ‘रात्र’ असणार आहे.
आता हे टू-डायमेन्शन चित्र आपण थ्री डायमेन्शन केलं, आणि L हा केशरी ठिपका आपण खालच्या बाजूला (दक्षिण दिशेला – दक्षिण ध्रुवाच्या बाजूला) सरकवला, तरी चंद्रावरच्या ‘सूर्योदय – सूर्यास्ताचे गणित’ बदलणार नाही, आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ नेलेल्या L साठीसुद्धा शुक्ल अष्टमी ते कृष्ण अष्टमी असाच ‘दिवस’ राहील.
ह्या महिन्यात २३ तारखेला (आज) दुपारी शुक्ल अष्टमी सुरू होईल, म्हणजेच दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार्या लँडरसाठी चंद्रावरचा दिवस सुरू होईल, जो ७-८ सप्टेंबरला येणाऱ्या कृष्ण अष्टमीला मावळेल… आणि आपला प्रग्यान रोव्हरसुद्धा ह्याच १५ दिवसांच्या कालखंडात, म्हणजेच चंद्रावरच्या एका दिवसाच्या कालावधीत आपली कामे संपवेल.
आता दर महिन्याची पहिली अष्टमी ते दुसरी अष्टमी ह्या कालावधीत चंद्रावर दिवसच असतो (आणि दुसरी अष्टमी ते पहिली अष्टमी ह्या कालावधीत चंद्रावर रात्रच असते)… त्यामुळे हा १५ दिवसांचा कालावधी सगळ्यात चांगला…
दुसरा पॅरामीटर येतो तो पृथ्वी – चंद्रामधल्या अंतराचा… आपल्याला माहिती आहे की चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असेल आणि त्याच वेळी शुक्ल अष्टमी असेल, तर काम करायला दिवस मिळेलच, त्याशिवाय चंद्रावर पोचायला इंधनसुद्धा कमी लागेल!… पण हे काँबिनेशन कायम मिळत नसल्याने त्यातल्या त्यात चांगले दिवस / अंतराचे काँबिनेशन इस्रोने ह्यावेळी ठरवले आहे…
लँडरच्या सगळ्या अंतर्गत सिस्टिम्स आत्तापर्यंत उत्तम काम करत आहेत, आणि प्री-लँडिंग चेक्स अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स देत आहेत… उड्डाणापासून ह्या क्षणापर्यंत सर्व सिस्टिम्स सुरळीत चालल्या आहेत, आणि कुठल्याही सिस्टिमचा प्लॅन बी कार्यरत करावा लागला नाहीये, हे सर्व सिस्टिम्स रोबस्ट आहेत, हे सिद्ध करत आहेत… त्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञ / तंत्रज्ञांचा आत्मविश्वाससुद्धा दुणावला आहे!…
लँडरला यशस्वी लँडिंगसाठी, आणि त्यानंतर रोव्हरला सर्व प्रयोग, निरीक्षणे उत्तमपणे पार पडण्यासाठी परत एकदा शुभेच्छा!… #ऑलदबेस्ट, लँडर!…
(२३ ऑगस्ट २०२३)
#चांद्रयान३ अपडेट
#All_is_Well! #ISRO #Chandrayaan #Chandrayaan_3 #Chandrayaan3 #इस्रो #चांद्रयान #चांद्रयान_३
(सौजन्य : फेसबुक)
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App