1-2 कोटी मुस्लिम मेले तरी चालतील!; काँग्रेस नेते अजिज कुरेशींचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले-आमच्या हातात बांगड्या नाहीत


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कांग्रेस नेते आणि उत्तर प्रदेश तसेच उत्तराखंडचे माजी राज्यपाल अजिज कुरेशी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या पक्षावरच म्हणजे काँग्रेसवर टीका करतानाच त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुस्लिमांनी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. 22 कोटींपैकी एक-दोन कोटी मेले तरी हरकत नाही असं ते म्हणाले आहेत.1-2 Crore Muslims will die!; Controversial statement of Congress leader Aziz Qureshi, said – We do not have bangles in our hands

कुरेशी म्हणाले की, मुस्लीम समुदाय सध्या भीतीच्या वातावरणात जगत आहेत. त्यांना धमकावले जात आहे. पण पाणी जेव्हा डोक्यावरून जाऊ लागते, तेव्हा पर्याय उरत नाही. मग आम्हीही हातात बांगड्या भरलेल्या नाही. 22 कोटीतले 1-2 कोटी मुस्लीम मेले तरी हरकत नाही, असे ते म्हणाले.काँग्रेसच्या भूमिकेवर केली टीका

काँग्रेसने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेवर कुरेशी यांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेसही मधून मधून हिंदुत्वाचा राग आळवत असते. काँग्रेसने त्यांच्या कार्यालयात मूर्ती ठेवणे, रामाच्या नावाने घोषणा देणे, पुजा करणे हे सर्व प्रकार म्हणजे नेहरूंच्या स्वप्नांची हत्या करण्यासारखे आहे. काँग्रेस एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. काही लोक ही ओळख बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही असे कुरेशी म्हणाले. या भूमिकेसाठी पक्षातून काढायचे तर काढून टाका असा इशाराही कुरेशी यांनी दिला. कुरेशी यांनी यावेळी गंगेबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले.

कुरेशी काँग्रेसचे मोठे नेते

अजिज कुरेशी हे काँग्रेसचे मोठे नेते आहे. दीर्घकाळ त्यांचा काँग्रेसशी संबंध आहे. कुरेशी हे 1984 साली सतनामधून लोकसभेमध्ये निवडून गेले होते. त्यानंतर मध्य प्रदेशच्या सरकारमध्येही ते कॅबिनेट मंत्री बनले होते. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मिझोरम अशा राज्यांमध्ये राज्यपाल पदही त्यांनी भूषवले आहे.

1-2 Crore Muslims will die!; Controversial statement of Congress leader Aziz Qureshi, said – We do not have bangles in our hands

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात