दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ऑक्सिजन पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर दोषारोप करत असताना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना चांगलेच खडसावले आहे.केंद्राकडून आठ ऑक्सिजन प्लॅँट उभारण्यासाठी परवानगी मिळाली असताना आपण एकच का उभारला असा सवाल केला आहे. तर वर्षापूर्वी आपण घरोघरी ऑक्सिजन पुरविण्याच्या केलेल्या आश्वासनाचे काय झाले असा सवाल खासदार मनोज तिवारी यांनी केला आहे.Why is Arvind Kejriwal silent now, Where did the promise to supply oxygen to homes go, why did only one set up eight oxygen plants despite getting permission?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ऑक्सिजन पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर दोषारोप करत असताना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना चांगलेच खडसावले आहे.
केंद्राकडून आठ ऑक्सिजन प्लॅँट उभारण्यासाठी परवानगी मिळाली असताना आपण एकच का उभारला असा सवाल केला आहे. तर वर्षापूर्वी आपण घरोघरी ऑक्सिजन पुरविण्याच्या केलेल्या आश्वासनाचे काय झाले असा सवाल खासदार मनोज तिवारी यांनी केला आहे.
केंद्र सरकारने डिसेंबर २०२० मध्ये दिल्ली सरकारला आठ प्रेशर स्विंग अॅबसॉरप्शन प्लॅँटसाठी परवानगी आणि निधी दिला होता. मात्र, त्यातील केवळ एकच आत्तापर्यंत उभारण्यात आला आहे.
विशेष म्हणजे सत्यवादी हरिश्चंद्रच् हॉस्पीटल, वर्धमान महावीर मेडीकल कॉलेज आणि सफदरजंग हॉस्पीटल यांन आत्तापर्यंत जागेसाठीही क्लिअरन्स दिलेला नाही. यापैकी दोन हॉस्पीटलनी आता कोठे साईट क्लिअरन्स दिला असून येथील प्लॅँटच्या उभारणीचे काम ३० एप्रिलपर्यंत सुरू होणार आहे.
घरोघरी ऑक्सिजन पोचविण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी ऑगस्टमध्येच दिले होते; पण पण प्रत्यक्षात तसे न होता आज ऑक्सिजनसाठी दिल्लीकर तडफडत आहेत.
ऑक्सिजनच्या प्रश्नावरून खासदार मनोज तिवारी यांनीही केजरीवाल यांना प्रश्न विचारला आहे. आपण आॅगस्ट २०२० मध्ये आश्वासन दिले होते की लवकरच घरोघरी ऑक्सिजन पुरविला जाईल. त्यावेळी आपण पत्रकार परिषदा घेऊन त्याच्या बातम्याही छापून आणल्या होत्या. त्याचे काय झाले? असा सवाल तिवारी यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दिल्लीतील रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. मात्र, अरविंद केजरीवाल हे त्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरत आहे.
Requesting each & every one of my followers to spare two minutes and watch this video. Eagerly awaiting your reactions. #Kejriwal pic.twitter.com/hrbYNmPadM — Priti Gandhi (Modi ka Parivar) (@MrsGandhi) April 23, 2021
Requesting each & every one of my followers to spare two minutes and watch this video. Eagerly awaiting your reactions. #Kejriwal pic.twitter.com/hrbYNmPadM
— Priti Gandhi (Modi ka Parivar) (@MrsGandhi) April 23, 2021
इतर राज्यांनी आपला ऑक्सिजन रोखल्याचाही आरोप करत आहेत. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही त्यांनी हा आरोप केला होता.
आठ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी केंद्राने दिल्ली सरकारला डिसेंबरमध्येच निधी दिला होता; पण या घडीला फक्त एकच प्रकल्प सुरू झालेला आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयातील कागदपत्रांवरून स्पष्ट होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App