वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी काँग्रेसबद्दल नरमल्या आहेत. मी कर्नाटकात काँग्रेसला पाठिंबा देत आहे, पण बंगालमध्येही काँग्रेसने आमच्याविरुद्ध लढू नये, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या भूमिकेने राजकीय पंडितही चकित झाले. यापूर्वी ममता एकला चलोबद्दल बोलताना सीपीएम, काँग्रेस आणि भाजपकडे एकाच नजरेने पाहत होत्या.Why did the Trinamool Congress take a U-turn? Experts say under pressure to usurp the status of a national party, the rise of the Congress is feared
ममतांनी भूमिका का बदलली? यासंदर्भात तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुर्शिदाबाद पोटनिवडणुकीत आणि त्यानंतरही एकला चलोचे धोरण जाहीर करूनही ममता यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व नाकारल्याच्या मुद्द्यावरून केंद्रावर टीका केली होती. दरम्यान, तृणमूलचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला. त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीने ममता यांना काँग्रेसबद्दलचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडले आहे. आता काँग्रेससोबत जाणे टीएमसीची मजबुरी आहे.
भारत जोडोनंतर काँग्रेस मजबूत झाली
तृणमूलच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, ममतांनी नेहमीच काँग्रेसपासून वेगळे अस्तित्व राखण्याचा प्रयत्न केला आहे. गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब होती. बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांचे खातेही उघडले नाही. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस अधिक मजबूत झाल्याचे तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा प्रासंगिक झाली आहे.
मात्र, ममता यांनी आपले धोरण बदलल्याचे जाहीरपणे मान्य करायला पक्ष तयार नाही. टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी स्पष्ट केले की, ‘भाजपविरोधी आघाडी बनवणे हे आमचे पूर्वघोषित तत्त्व आहे. सागरदिघी पोटनिवडणुकीनंतर ममतांच्या ‘एकला चलो’च्या वक्तव्याचा अर्थ बंगालमध्ये कोणाशीही युती करण्याची गरज नाही. भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही एकटेच पुरेसे आहोत, पण राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात आघाडी करणे हे आमचे जुने धोरण आहे.
लोकसभा निवडणुकीत टीएमसीची दुर्दशा होणार : भाजप
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणतात की, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात आपल्या पक्षाची दुर्दशा होणार आहे, हे ममतांना कळून चुकले आहे. यामुळेच त्यांनी काँग्रेसचा हात धरला आहे. आम्ही किती जागा लढवणार हे ममता ठरवू शकत नाही, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे. काँग्रेसशिवाय भाजपविरुद्ध लढणे आणि जिंकणे अशक्य आहे, हे ममतांना माहीत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App