वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा याला भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते. तहव्वूर (62) हा अमेरिकेच्या तुरुंगात बंद आहे. लॉस एंजेलिसच्या जिल्हा न्यायालयाने 16 मेच्या आदेशात म्हटले आहे की, तहव्वूरच्या प्रत्यार्पणाची मागणी ज्या आरोपांच्या आधारे करण्यात आली आहे, ते पाहता त्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली जाऊ शकते.US court approves extradition of 26/11 Mumbai terror attack accused Tahavur Rana to India
2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने मुंबईत दहशतवादी हल्ला केला होता. त्याच संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तहव्वूरच्या भूमिकेची चौकशी करत आहे. या हल्ल्यांमध्ये तहव्वूरच्या भूमिकेमुळे भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली, त्यानंतर त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली होती.
हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीचा बालमित्र आहे तहव्वूर
न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की तहव्वूर हा हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र होता आणि हेडली लष्कर-ए-तैयबाशी जवळून काम करत होता हे माहीत आहे. हेडलीला आर्थिक मदत करून तहव्वूर दहशतवादी संघटना आणि त्याच्यासह दहशतवाद्यांनाही मदत करत होता.
हेडली कोणासोबत भेटत होता आणि तो काय बोलत होता हे राणाला माहीत होते. हल्ल्याचे नियोजन आणि काही लक्ष्यांची नावेही त्याला ठाऊक होती. राणा हा या संपूर्ण कटाचा एक भाग होता आणि त्याने दहशतवादी हल्ल्याला आर्थिक मदत केल्याचा गुन्हा केला असण्याची दाट शक्यता आहे, असे अमेरिकन सरकारने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App