सत्तेत जाताच अजित पवारांची चौकशी का थांबली? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले- गुन्हे मागे घेतले नाहीत, प्रकरण न्यायप्रविष्ट

Why did the investigation of Ajit Pawar

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोणावरचेही गुन्हे मागे घेतलेले नाही. सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे त्यांच्यावर न्यायालय कारवाई करेल. आमच्या मार्गदर्शनानुसार न्यायालय चालत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. भाजपला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? असा सवाल करण्यात आला होता, यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.Why did the investigation of Ajit Pawar stop as soon as he came to power? Union Home Minister Amit Shah said – the cases have not been withdrawn, the case is pending

अमित शहा पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही म्हणत असाल तर आम्ही हे प्रकरण पुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवतो. पण इतर अनेक सामान्य नागरिकांचीही प्रकरणे प्रलंबित असतात. त्यांनाही न्याय दिला पाहिजे. राष्ट्रवादीत फूट पाडून भाजपाबरोबर गेलेल्या अजित पवारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोडो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. असा आरोप केल्याच्या काहीच दिवसांत अजित पवारांनी भाजपला साथ दिली. त्यामुळे भाजपत गेल्याने अजित पवारांवरील गुन्हे रद्द झाले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.



यंत्रणा त्यांचे काम करतील

अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी, सोनिया गांधी, पी. चिंदबरम यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. पण त्यांची प्रकरणे आता कुठे सुरू आहेत. यांच्यावर 9-10 वर्षांपासून गुन्हे दाखल आहेत. आम्ही आमचे काम केले. आता यंत्रणा यांची चौकशी करतील, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. एनसीपीवर जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खोदकाम घोटाळा अशी ही यादी न थांबणारी असल्याचा हल्लाबोल पंतप्रधानांनी केला होता. या आरोपानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. आता अजित पवार हे महायुतीतील घटक आहेत.

Why did the investigation of Ajit Pawar stop as soon as he came to power? Union Home Minister Amit Shah said – the cases have not been withdrawn, the case is pending

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात