दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांना संधी देत महाराष्ट्राबाहेरील पोटनिवडणूक लढवली. Who will win? Counting begins at Dadra Nagar Haveli; BJP’s Mahesh Gavit’s is heavy
विशेष प्रतिनिधी
सिल्वासा : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना संधी देत महाराष्ट्राबाहेरील पोटनिवडणूक लढवली. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित आणि काँग्रेसचे महेश धोदी यांच्यात तिरंगी लढत झाली. पोटनिवडणुकीत 75.91 टक्के मतदान पार पडलंय. 333 मतदान केंद्रांवर मतदान झालं.
भाजपकडून या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय सचिव, भाजपा आणि प्रदेश प्रभारी विजया रहाटकर यांनी प्रचंड मेहनत घेतली. महेश गावित यांच्या विजयाचे लक्ष्य ठेवतं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी ,केंद्रीय मंत्रीभारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रचार केला. तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी प्रचारात सहभाग घेतला.
30 ऑक्टोबरला 3 लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं. दादरा नगर हवेली, हिमाचल प्रदेशमधील मंडी आणि मध्य प्रदेशातील खंडवा या जागांवर मतदान झालं. तर, देशभरातील विधानसभेच्या 29 जागांवर पोटनिवडणूक पार पडली. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलंय.
शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित (Mahesh Gavit) आणि काँग्रेसचे महेश धोदी (Mahesh Dhodi) यांच्यात तिरंगी लढत झाली.
पोटनिवडणुकीत 75.91 टक्के मतदान पार पडलंय. 333 मतदान केंद्रांवर मतदान झालं. भाजपकडून या निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी प्रचारात सहभाग घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App