विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय करन्सी नोटांवर महात्मा गांधी यांच्याबरोबरच लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो छापावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आणि त्यानंतर देशभर नोटांवर फोटो कुणाचे छापायचे, या मुद्द्यावर प्रतिक्रियांची यादी लांबच चालली आहे. प्रत्येक पक्षाचा नेता आपल्या मनाला वाटेल ते यावर बोलत आहे. इतकेच नाही तर त्यामुळे नोटांवर फोटो छापायचे कोणाचे याची यादीही लांबत चालली आहे. Who to print photos on notes
अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाचे फोटो छापायची मागणी केल्यानंतर सुरुवातीला भाजप आणि काँग्रेस मधून काहीसा विरोधी सुर उमटला. पण बाकीच्या पक्षांच्या नेत्यांनी मात्र नोटांवर छापायच्या फोटोंची यादी वाढवायला सुरुवात केली. भाजपचे महाराष्ट्रातले आमदार राम कदम यांनी नोटांवर लक्ष्मी – गणेश हे फोटो छापायला हरकत नाही. पण नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही फोटो छापावेत अशी सूचना करणारे ट्विट केले. भाजपचे दुसरे आमदार नितेश राणे यांनी फोटोवर छत्रपती नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापावा. यही परफेक्ट है, असे ट्विट केले.
अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी ! pic.twitter.com/OPrNRu2psl — Ram Kadam ( modi ka parivar ) (@ramkadam) October 27, 2022
अखंड भारत.. नया भारत.. महान भारत..
जय श्रीराम .. जय मातादी ! pic.twitter.com/OPrNRu2psl
— Ram Kadam ( modi ka parivar ) (@ramkadam) October 27, 2022
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी नोटांवर फोटो छापण्याच्या निमित्ताने भाजप आणि केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडून घेतले, पण ठाकरे गटाचे दुसरे नेते माझी परिवहन मंत्री अनिल परब यांनी नोटांवर मोदींचा फोटो छापायचा तर माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का नको?, असे म्हणून नोटांवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापण्याची मागणी केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या मुद्द्यावर सावध प्रतिक्रिया देत कोणीही नेता त्याच्या मनाला वाटेल तसे बोलत असतो, एवढीच प्रतिक्रिया देऊन काढता पाय घेतला.
पण एकूण अरविंद केजरीवालांनी नोटांवर लक्ष्मी – गणेशाची प्रतिमा छापा असे सांगून भारतीय राजकारणात खळबळ उडवली आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना या मुद्द्यावर मत व्यक्त करणे भागच पडले. त्यातून नोटांवर छापायच्या फोटोंची यादी मात्र लांबलचक वाढत चालली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App