कोण आहेत नागालँडच्या पहिल्या महिला मंत्री? : जाणून घ्या, सल्हौतुओनुओ क्रुसी यांच्याबद्दल, 60 वर्षांनी झाला ऐतिहासिक बदल

प्रतिनिधी

नवी दिल्ली : नागालँडमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नागालँडमध्ये ऐतिहासिक बदल पाहायला मिळाले. नागालँड राज्याच्या निर्मितीला जवळपास 60 वर्षे झाली आहेत. नागालँडची स्थापना 1963 मध्ये झाली, त्यानंतर पहिल्यांदाच नागालँडमध्ये महिला मंत्री नियुक्त झाल्या आहेत. इतिहास रचत 2 मार्च 2023 रोजी पहिल्यांदा नागालँडच्या महिलांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. तसेच एका महिलेची राज्याच्या पहिल्या महिला मंत्री म्हणून निवडही झाली.Who is the first woman minister of Nagaland? Learn about Salhoutuonuo Krusi, a historic change after 60 years

सल्हौतुओनुओ क्रुसी यांनी नागालँडच्या पहिल्या महिला मंत्री म्हणून शपथ घेतली. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे 7 मार्च रोजी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागालँडच्या पहिल्या महिला मंत्री होण्याचा मान मिळवणाऱ्या क्रुसी कोण आहेत आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे, हे जाणून घेऊया.



नागालँडमध्ये प्रथमच 2 महिला आमदार

नागालँडच्या पहिल्या महिला मंत्री झालेल्या साल्हौतुओनुओ क्रुसी यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. खरं तर, राज्याच्या स्थापनेनंतर 60 वर्षांनी नागालँडमध्ये दोन महिला आमदार म्हणून निवडून आल्या. ही नागालँडची 13वी विधानसभा निवडणूक होती, ज्यामध्ये साल्हौतुओनुओ क्रुसी आणि हेकानी जाखालू यांनी विजय मिळवून महिलांना विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा केला.

कोण आहेत साल्हौतुओनुओ क्रुसी?

विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या साल्हौतुओनुओ क्रूसी यांनी कोहिमा येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. क्रुसी नागालँडच्या रहिवासी असून त्या येथे हॉटेल चालवतात. क्रुसी या एनडीपीपीचे दिवंगत उमेदवार कविसेखो क्रुसी यांच्या पत्नी आहेत. 2018 मध्ये नागालँड विधानसभा निवडणुकीत कविसेखो यांचा पराभव झाला होता. नंतर 2021 मध्ये कोविडमुळे त्यांचा मृत्यू झाला होता.

आपल्या पतीची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी क्रूसी यांनी यावर्षी नावनोंदणी केली. तिने पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि वेस्टर्न अंगामी जागेवरून केनेझाको नाखारो यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या. या जागेवर त्यांनी अवघ्या 7 मतांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. नंतर पंतप्रधानांसमोर राज्याच्या पहिल्या महिला मंत्री म्हणून शपथ घेतली.

क्रूसी यांचे शिक्षण आणि उपलब्धी

साल्हौतुओनुओ क्रुसी यांनी त्यांचे पूर्व-विद्यापीठ शिक्षण कोहिमा महाविद्यालयातून केले. नंतर नागालँडमध्येच एका खासगी शाळेत मालक म्हणून काम केले. त्या सामाजिक सुधारणा आणि महिलांच्या उन्नतीसाठीही कार्यरत आहेत आणि अंगामी महिला संस्थेच्याही प्रमुख आहेत.

Who is the first woman minister of Nagaland? Learn about Salhoutuonuo Krusi, a historic change after 60 years

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात