वृत्तसंस्था
कोलकाता : सिंगूर मधून टाटांना कोणी हाकलले??… 12 वर्षांनी ममता आणि कम्युनिस्टांनी आरोप एकमेकांवर ढकलले!! अशी अवस्था आज खरंच आली आहे. कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये पश्चिम बंगाल मधली हुगळी जिल्ह्यातील सिंगूर मधली टाटांना दिलेली जमीन काढून घेतली. त्यामुळे टाटांचा नॅनो प्रकल्प सिंगूर मधून बाहेर पडून तो गुजरातच्या सानंद मध्ये गेला. सध्या सानंद मध्ये टाटांची नॅनो फॅक्टरी सुरू आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी 12 वर्षांनंतर टाटांच्या सिंगूर प्रकल्पाबाबत वाद उकरून काढला आहे. Who drove the Tatas out of Singur? mamata banerjee
सिलिगुडी मध्ये विजय संमेलनात बोलताना ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालच्या उद्योग धोरणाविषयी बोलताना टाटांना सिंगूर मधून आपण बाहेर काढले नाही, तर पश्चिम बंगाल मधल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने लोकांकडून बळजबरीने जमीन घेऊन टाटांना दिली होती, ती फक्त आपण काढून घेतली, असा दावा केला आहे. कम्युनिस्ट पक्षाने मात्र ममता बॅनर्जी यांचा दावा खोडून काढला आहे.
टाटांच्या सिंगूर मधील प्रकल्पा विरोधात ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये मोठे आंदोलन उभे केले होते. 2011 मध्ये त्यांची सत्ता आल्यानंतर सिंगर मधून टाटांचा नॅनो प्रकल्प बाहेर गेला.
मात्र, सिलिगुडीतील विजय संमेलनात बोलताना ममता बॅनर्जींनी आपले सरकार उद्योग प्रेमी असल्याचे आवर्जून सांगितले. काही लोक नुसती बकवास करतात, की मी टाटांना सिंगूर मधून बाहेर काढले. टाटा नोकऱ्या देत होते. पण माझ्यामुळे ते बाहेर गेले. मात्र ही वस्तुस्थिती नाही. त्यावेळी कम्युनिस्ट पार्टीच्या सरकारने जनतेची जमीन बळजबरीने घेऊन ती टाटांना दिली होती. ज्यांना जमीन द्यायची नव्हती, त्यांच्यावर सरकारने बळजबरी केली होती. मी त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. माझे सरकार आल्यानंतर मी ती जमीन त्यांच्या मूळ मालकांना परत केली. आम्ही कोणत्याही उद्योगपतीशी भेदभाव करत नाही किंवा आमचे सरकार उद्योगधंद्याच्या विरोधात नाही, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.
ममता बॅनर्जी यांचा दावा कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीचे सदस्य सुजाण चक्रवर्ती यांनी खोडून काढला आहे. ममता बॅनर्जी खोटं बोलत आहेत. त्यांना खरं ऐकण्याची सवय देखील राहिलेली नाही. 2006 मध्ये बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री झाल्यानंतर टाटांनी सिंगूर मध्ये नॅनो कारखाना सुरू करण्याची घोषणा केली होती. कम्युनिस्ट सरकारने त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले होते. परंतु ममता बॅनर्जी यांनी टाटांच्या नॅनो प्रकल्पाविरुद्ध रान उठवले. त्यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी ताटांना आधीच्या सरकारने दिलेली जमीन देखील परत घेतली. त्यामुळे सिंगूर मधील नॅनो प्रकल्प पश्चिम बंगाल बाहेर गेला असा आरोप सुजाण चक्रवर्ती यांनी केला आहे.
2022 मध्ये टाटा जेव्हा इंडियन एअरलाइन्सचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मोठी योजना बनवत आहेत, तेव्हा पश्चिम बंगाल मधील सिंगूर मधल्या टाटा नॅनोच्या प्रकल्पाबाबत जुना वाद पुन्हा उकरून काढणे आणि ममता बॅनर्जी आणि कम्युनिस्टांनी एकमेकांवर आरोप करणे याला वेगळा राजकीय वास आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App