आजी – बाबा यांच्यापासूनची सिस्टीम निम्न जातींच्या विरोधातच; मोदींना टार्गेट करताना राहुलनी काढले इंदिरा + राजीव गांधींचेच वाभाडे!!

वृत्तसंस्था

पंचकुला (हरियाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तोफा डागताना राहुल गांधी आपल्या आजीचे आणि वडिलांचेच वाभाडे काढून बसले. हरियाणामध्ये प्रचार सभेत बोलताना राहुल गांधींनी असे काही शॉट मारले, की त्यांना ते नरेंद्र मोदींना बसले, असे वाटले. परंतु, प्रत्यक्षात त्या शॉटनी इंदिरा गांधी राजीव गांधी आणि मनमोहन यांच्याच राजकीय विकेट्स काढल्या.  While targeting Modi, Rahul made use of Indira + Rajiv Gandhi

राहुल गांधी म्हणाले :

कुठलीही सिस्टीम माझ्यापासून लपून राहू शकत नाही. कारण मी सिस्टीम मध्ये जन्माला आलो. मी सगळी सिस्टीम आतून पाहिली आहे. माझी आजी, माझे वडील आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मी पंतप्रधानांचे कार्यालय आणि पंतप्रधानांचे घर आतून कसे चालते, ती सगळी सिस्टीम बघितली आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की सगळी सिस्टीम निम्न जातींच्या विरोधामध्ये काम करते.

ही सगळी सिस्टीम नेमकी कुणाला वाचवते?? कोणाच्या बचावासाठी काम करते??, कोणावर आक्रमण करते??, सिस्टीम मधला कोण कुणाचा कुठे वापर करतो?? सगळे मी आतून पाहिले आहे.

आजही देशातील कुठलीही सिस्टीम तुम्ही बघा कॉर्पोरेट सिस्टीम किंवा न्याय व्यवस्था, मीडिया किंवा अन्य कुठलीही खाजगी व्यवस्था या सगळ्या तुम्हाला निम्न जातींच्या विरोधातच काम करताना दिसतील.

ही सगळी वक्तव्ये करून प्रत्यक्षात राहुल गांधी मोदींचे वाभाडे काढायला गेले, पण ते प्रत्यक्षात इंदिरा आणि राजीव गांधींचेच वाभाडे काढून बसले.

While targeting Modi, Rahul made use of Indira + Rajiv Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात