2000 रुपयांची नोट घेण्यास एखाद्याने नकार दिला तर काय कराल? जाणून घ्या RBIने काय म्हटले!!


प्रतिनिधी

मुंबई : 2000 रुपयांची नोट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. RBI ने 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर काढण्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 च्या नोटा जारी न करण्याचे आदेश दिले आहेत. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध मानल्या जातील, असे आरबीआयने म्हटले आहे. 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा कराव्या लागणार आहेत.What to do if someone refuses to accept a 2000 rupee note? Know what RBI said!!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा इतर मूल्यांच्या चलनात बदलल्या जाऊ शकतात.



2000 रुपयांच्या नोटा कधी आणि किती बदलता येतील?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी कोणतेही बंधन नाही. मात्र, त्यासाठी नंतर सविस्तर नियम जारी केले जातील. या नोटा 23 मे पासून बदलता येतील. 2000 रुपयांची नोट, नंतर 20 हजार रुपयांच्या मर्यादेत बदलता येईल. हे चलन 23 मे 2023 पासून बदलता येईल.

कोणी नोटा बदलून घेण्यास नकार दिल्यास काय करावे?

तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील आणि तुम्हाला त्या बदलून घ्यायच्या असतील तर तुम्ही बँकेत जाऊन त्या जमा करू शकता. 30 सप्टेंबर 2023 पूर्वी, जर दुकानदार, बँक शाखा किंवा इतर कोणत्याही बँकेने 2000 रुपये घेण्यास नकार दिला तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता.

कुठे कराल तक्रार?

जर कोणी नोट बदलून देण्यास नकार दिला तर ग्राहक संबंधित बँकेत जाऊन तक्रार करू शकतो. तथापि, जर बँक 30 दिवसांच्या आत उत्तर देत नसेल किंवा तक्रारदार बँकेच्या उत्तराने समाधानी नसेल, तर तो RBI पोर्टल cms.rbi.org.in वर आपली तक्रार नोंदवू शकतो.

कधी चलनात आल्या 2000 रुपयांच्या नोटा?

पहिल्यांदा 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली. नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या आणि त्याऐवजी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या.

What to do if someone refuses to accept a 2000 rupee note? Know what RBI said!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात