दोन मालगाड्या धडकल्याने १४ गाड्या रद्द, तीन मार्ग बदलले
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमधील बांकुराजवळ रविवारी पहाटे दोन मालगाड्या एकमेकांवर धडकल्या, त्यामुळे अनेक डबे रुळावरून घसरले. ओंडा स्थानकात ही घटना घडली. रविवारी पहाटे चार वाजता बांकुराजवळ दोन मालगाड्यांची धडक झाल्यानंतर अनेक डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात आले. West Bengal Two goods trains collided at Onda railway station in Bankura
एका मालगाडीने दुसऱ्या मालगाडीला मागून धडक दिल्याने मालगाडीच्या आठ वॅगन रुळावरून घसरल्या. ओंडा स्थानकात ही घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालगाडीचा चालक किरकोळ जखमी झाला आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ‘दोन्ही रिकाम्या मालगाड्या होत्या. अपघाताचे कारण आणि दोन गाड्यांची टक्कर कशी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.रेल्वेच्या ADRA विभागातील रेल्वे सेवा या अपघातामुळे प्रभावित झाली आहे. ADRA विभागात पश्चिम बंगालमधील चार जिल्ह्यांचा समावेश आहे – पश्चिम मिदनापूर, बांकुरा, पुरुलिया, बर्दवान आणि झारखंडमधील तीन जिल्हे – धनबाद, बोकारो आणि सिंगभूम हे दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत येतात. पुरुलिया एक्स्प्रेस सारख्या काही गाड्या या भागातून पुढे जाऊ शकतील यासाठी रेल्वे अधिकारी अपलाइन लवकरात लवकर उघडण्याचा प्रयत्न करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App