विशेष प्रतिनिधी
कोलकाता : खेला होबे.. की खेला शेष..? खेळ रंगणार की खेळ संपला..? पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक निवडणुकीचा निकाल काय असेल, या लाख मोलाच्या प्रश्नाचे उत्तर देताना एक्झिट पोल्सदेखील गांगरले. एक्झिट पोल्सच्या दुभंगण्यावरून स्पष्ट होते, की बंगालमध्ये दीदी आणि मोदी दादा यांच्यामध्ये काँटे की टक्कर आहे आणि जनमताचा नेमका अंदाज एक्झिट पोल्सनादेखील येऊ शकला नाही. दुसरीकडे, त्रिशंकू विधानसभेचीही टांगती तलवार लटकलेली दिसते आहे. West Bengal The Focus India Exit Poll Results 2021
टाइम्स नाऊ सी व्होटर यांच्यामते ममता बॅनर्जी १५२-१६४ जागा मिळवून तिसरयांदा सत्तेवर येतील, पण २०१६च्या तुलनेत त्यांना जबरदस्त फटका बसेल. सी व्होटरच्या मते, भाजपला ११५ जागा मिळतील. पी मार्क या नव्या संस्थेने ममतांना १५८ जागा दिल्यात. याउलट रिपब्लिक – सीएनएक्सच्या मते, भाजप कसे बसे बहुमताच्या जवळपास पोहोचेल. तर जन की बात यांनी भाजपला तब्बल १६२ जागा दिल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App