विशेष प्रतिनिधी
कोलकता – दुर्गापुजेदरम्यान शेजारील देशांत घडलेल्या हिंसक घटनांबाबत सोशल मिडीयाचा गैरवापर आणि खोट्या बातम्या पसरविण्याच्या प्रयत्नांविरुद्ध प्रामुख्याने बांगलादेश सीमेलगतच्या जिल्हा प्रशासनांनी दक्ष राहावे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, असे आदेश पश्चिम बंगाल सरकारने दिले.West Bengal gives prohibitive orders
येत्या काही दिवसांत मुर्ती विसर्जन तसेच फतेहा-द्वाझ-दहम सण होणार आहे. अशावेळी राज्यात कुठेही शांतताभंग करण्याच्या प्रयत्नांचा बीमोड करण्यासाठी सज्ज राहावे अशा सूचना राज्यातील सर्व संबंधित संस्थांना देण्यात आल्या आहेत.
गुप्तचर शाखेच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांनीही सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. याविषयी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार १३ ऑक्टोबरपासून सोशल मिडीयावर बांगलादेशातील दुर्गा पूजा देखाव्यांवरील हल्ल्याच्या पोस्टचा भडिमार होत आहे.
त्यामुळे सीमेलगतच्या जिल्यांतील वातावरण अतिसंवेदनशील बनले आहे. विविध कट्टर हिंदू संघटनांचे नेते सक्रिय बनले आहेत. अशावेळी तुम्ही अधिकाऱ्यांनी आणि तुमच्या नियंत्रणाखालील कर्मचाऱ्यांनी अधिक सजग राहावे आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी काटेकोर लक्ष ठेवावे,
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App