West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलेलं असतानाच आता ममता बॅनर्जींच्या एका पावलानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असलेल्या पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून सर्वांनी एकत्र येण्याची विनंती केली आहे. ममता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या पत्राचा आता अनेक बाजुंनी उहापोह करण्यात येत असून त्याबाबत विविध मतमतांतरेदेखिल समोर येऊ लागली आहेत. या प्रकारानंतर ममता बॅनर्जींच्या विरोधात भाजप अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. भाजपनं अनेकदा ममता बॅनर्जींना पराभव दिसत असल्याची टीका केली आहे. त्यात ममता बॅनर्जी यांनी मतदानाच्या तोंडावर अशाप्रकारे पत्र लिहिल्याने भाजपला टीका करण्याची आयतीच संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. West Bengal Election Mamata Banerjees letter to opposition leaders creates new uproar
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App