वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकप्रिय केलेली घोषणा “खेला होबे” या बंगाली म्हणीचा वापर संपूर्ण देशभर करून घेण्याचा प्रयोग त्यांनी अवलंबला आहे. याची सुरूवात त्यांनी बंगालमधून केली आहे.West Bengal CM Mamata Banerjee dribbling a football during launch of “Khela Hobe” program at Netaji Indoor Stadium,Kolkata
राज्यात फुटबॉल खेळाच्या प्रमोशनसाठी ममता सरकारने मोठा प्रोग्राम आयोजित केला आहे त्यालाच “खेला होबे” हे नाव त्यांनी दिले आहे. कोलकत्याच्या नेताजी सुभाष चंद्र बोस स्टेडियम मध्ये एका भव्य कार्यक्रमात “खेला होबे” प्रोग्रामचे उद्घाटन ममता बॅनर्जी यांनी केले. त्यावेळी त्यांनी राजकीय भाषण केले केला. “खेला होबे” ही घोषणा पश्चिम बंगालमध्ये लोकप्रिय झाली. संसदेत देखील आता ती दिली जाते. “खेला होबे” लवकरच देशभरात लोकप्रिय घोषणा होईल, असे राजकीय भाकीत ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
#WATCH | West Bengal CM Mamata Banerjee dribbling a football during launch of “Khela Hobe” program at Netaji Indoor Stadium,Kolkata. She says, " Believe it or not, "Khela Hobe" has become very popular. The slogan was raised in Parliament too, soon it'll be popular across India." pic.twitter.com/xDZYGtQKAD — ANI (@ANI) August 2, 2021
#WATCH | West Bengal CM Mamata Banerjee dribbling a football during launch of “Khela Hobe” program at Netaji Indoor Stadium,Kolkata. She says, " Believe it or not, "Khela Hobe" has become very popular. The slogan was raised in Parliament too, soon it'll be popular across India." pic.twitter.com/xDZYGtQKAD
— ANI (@ANI) August 2, 2021
पश्चिम बंगालमध्ये फुटबॉल अतिशय लोकप्रिय खेळ आहे. युवकांमध्ये आणखीन या खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या स्पोर्टिंग क्लब 100000 फुटबॉल मोफत देण्याची ममता बॅनर्जी सरकारची योजना आहे. कुठल्याही स्पोर्टिंग क्लबने राज्य सरकारकडे नोंदणी केली की त्यांना जोयी कंपनीचे हँडमेड 10 फुटबॉल राज्य सरकारतर्फे मोफत देण्यात येणार आहेत. बंगालमधील युवकांना फुटबॉलकडे अधिक आकर्षित करण्यासाठी तसेच राजकीयदृष्ट्या तृणमूल काँग्रेसकडे आकर्षित करण्यासाठी हा “खेला होबे” प्रोग्राम आहे. पुढचे पाच वर्ष हा प्रोग्रॅम चालणार आहे.
16 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमध्ये “खेला होबे दिन” साजरा करण्यात येईल. १९८० मध्ये या दिवशी कोलकत्याच्या इडन गार्डनमध्ये फुटबॉल मॅच झाली होती. त्यावेळी अनेक फुटबॉल प्रेमींचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ “खेला होबे” दिन पाळण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App