विशेष प्रतिनिधी
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या खेला करून दाखविला. त्यानंतर त्यांच्यावर स्तुतिसुमनांची उधळण करणारे ट्विटर ट्रेंड जोरात आलेत. ट्विटर ट्रेंडमध्ये “खेला होबे”, “नरेंद्र मोदी ग्लोबल पप्पू” आणि “दीदी ओ दीदी” टॉपवर आलेत. West bengal assemblyelections 2021 reactions, twitter trends snubs BJP
हे सगळे शब्द बंगालच्या निवडणूकीत परवलीचे शब्द बनले होते. तेच शब्द आज नेटकऱ्य़ांनी ट्विटर हॅशटॅगमध्ये रूपांतर करून जोरदार चालविले आहेत. खेला होबे हे ममता बॅनर्जींचे उद्गार होते आणि त्यांनी ते खरे करून दाखविले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ममता बॅनर्जींना प्रत्येक जाहीर सभेत दीदी ओ दीदी म्हणून हाक मारल्यासारखे संबोधत होते. या दोन्ही परवलीच्या शब्दांचे हॅशटॅग ट्विटरवर टॉप १० मध्ये आहेत.
त्याच बरोबर २०१४ पासून पप्पू हा शब्द जो वायनाडचे खासदार राहुल गांधींना चिकटला होता, तो आता नेटकऱ्यांनी मोदींना चिकटविण्याचा प्रयत्न केला आहे. यात नेटकऱ्यांनी फक्त ग्लोबल शब्द वाढविला आहे. कारण मोदी समर्थकांनी मोदींचे नेतृत्व जागतिक पातळीवरचे असल्याचा डंका सातत्याने पिटला आहे.
या खेरीज टीएमसी २०० पार, नंदीग्राम आणि हावडा ब्रीज हे हॅशटॅगही जोरात चालू आहेत. ज्यातून भाजप समर्थकांना खिजविण्यात येते आहे. कारण २०० पार हा नारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपसाठी दिला होता. मुलाखतींमध्ये वारंवार त्यांनी तसा आत्मविश्वास व्यक्त केला होता. पण तो फेल गेल्यानंतर टीएमसी २०० पार हॅशटॅग चालवून सोशल मीडिया यूजर्सनी अमित शहांच्या दाव्याचीही खिल्ली उडविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App