विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील माफिया डॉन मुख्तार अन्सारी जेल मध्ये आहे. पण अजून त्याची हेकडी गेलेली नाही. मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारी उत्तर प्रदेशातील मऊ मतदारसंघातून सोहेल देव समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. तेथे त्याने प्रचारात धमकीभरली भाषा वापरली आहे. We will “account” all the officials in 6 months after coming to socialist power; Threats of Don Mukhtar’s son Abbas Ansari !!
समाजवादी पक्ष सत्तेवर येऊ देत. येत्या 6 महिन्यात सगळ्या अधिकार्यांचेही हिसाब किताब करून टाकू, असा दम त्याने अधिकाऱ्यांना दिला आहे. याचा व्हिडिओ उत्तर प्रदेशात ठिक ठिकाणी व्हायरल होतो आहे. अब्बास अन्सारीच्या या धमक्यांची दखल घेऊन उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
जो मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेश मध्ये येण्यास घाबरत होता आणि पंजाब मध्ये रोपड जेलमध्ये पडून होता, त्या मुख्तार अन्सारीच्या मुलाने अब्बास अन्सारीने असली धमकीभरली भाषा वापरली आहे. मऊ मधल्या प्रचारसभेत अब्बास अन्सारी म्हणाला, की मी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना भेटलो आहे. त्यांना मी सांगितले आहे, की समाजवादी पार्टी सत्तेवर आली तरी येत्या 6 महिन्यात कोणत्याही अधिकाऱ्याची बदली करू नका. या सगळ्या अधिकाऱ्यांचा 6 महिन्यात “हिसाब किताब” करू आणि मगच त्यांच्या बदलांविषयी विचार करू.
माफ़िया मुख्तार के साहिबज़ादे ने अखिलेश भइया से कह दिया है कि छह महीने से पहले किसी अधिकारी का तबादला नहीं करना है, तबादला तभी होगा जब हिसाब किताब पूरा हो जायेगा… कौन सा हिसाब पूरा करने के ख़्वाब देख रहा है? अभी तक हवा का रुख़ समझ में नहीं आया लगता है… pic.twitter.com/qztM7JyFPI — Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) March 4, 2022
माफ़िया मुख्तार के साहिबज़ादे ने अखिलेश भइया से कह दिया है कि छह महीने से पहले किसी अधिकारी का तबादला नहीं करना है, तबादला तभी होगा जब हिसाब किताब पूरा हो जायेगा…
कौन सा हिसाब पूरा करने के ख़्वाब देख रहा है? अभी तक हवा का रुख़ समझ में नहीं आया लगता है… pic.twitter.com/qztM7JyFPI
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) March 4, 2022
कोणत्याही अधिकाऱ्याला सोडणार नाही, अशी दमबाजी अब्बास अन्सारीने केली आहे. मऊ मतदार संघात शेवटचा टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. अब्बास अन्सारीच्या धमकी भरल्या भाषणाच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करण्यात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App