WB-Assam 2nd Phase Voting : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसर्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. बंगालमधील 30 आणि आसाममधील 39 जागांवर आज मतदान होत आहे. बंगालची सर्वात लोकप्रिय जागा असलेल्या नंदीग्रामवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे त्यांचे माजी मित्रपक्ष आणि आता भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात उभे आहेत. निवडणूक पाहता नंदीग्राममध्ये सुरक्षेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दोन्ही राज्यांच्या मतदारांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. WB-Assam 2nd Phase Voting begins PM Modi appeals for record turnout
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसर्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. बंगालमधील 30 आणि आसाममधील 39 जागांवर आज मतदान होत आहे. बंगालची सर्वात लोकप्रिय जागा असलेल्या नंदीग्रामवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे त्यांचे माजी मित्रपक्ष आणि आता भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात उभे आहेत. निवडणूक पाहता नंदीग्राममध्ये सुरक्षेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दोन्ही राज्यांच्या मतदारांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
Urging the people of West Bengal in whose seats there is polling taking place today to vote in record numbers. — Narendra Modi (@narendramodi) April 1, 2021
Urging the people of West Bengal in whose seats there is polling taking place today to vote in record numbers.
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2021
पश्चिम बंगालमधील चार जिल्ह्यांत निवडणुका होत आहेत. हे जिल्हा दक्षिण 24 परगणा, पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर आणि बांकुरा आहेत. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांच्यात हाय-व्होल्टेज निवडणूक प्रचार झालेला आहे. ममता बॅनर्जी स्वत: कित्येक दिवस नंदीग्राममध्ये राहिल्या, तर अमित शहा यांच्यापासून ते सर्व भाजप नेत्यांनी शुभेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ प्रचार केला आहे.
पश्चिम बंगाल: पश्चिम मिदनापुर ज़िले के डेबरा में विधानसभा चुनाव के दूसरे चरण में मतदान हो रहे हैं। पश्चिम बंगाल में आज विधानसभा की 30 सीटों पर मतदान हो रहे हैं। #WestBengalElections2021 pic.twitter.com/nUITYlsrQV — ANI_HindiNews (@AHindinews) April 1, 2021
पश्चिम बंगाल: पश्चिम मिदनापुर ज़िले के डेबरा में विधानसभा चुनाव के दूसरे चरण में मतदान हो रहे हैं। पश्चिम बंगाल में आज विधानसभा की 30 सीटों पर मतदान हो रहे हैं। #WestBengalElections2021 pic.twitter.com/nUITYlsrQV
— ANI_HindiNews (@AHindinews) April 1, 2021
पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 84.13 टक्के मतदान झाले. दुसर्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 171 उमेदवारांची अग्निपरीक्षा होणार आहे. मतदारांची संख्या 75 लाख 94 हजार 549 आहे. तर मतदान केंद्रांची एकूण संख्या 10 हजार 620 आहे. दुसर्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सर्व बूथ संवेदनशील मानले जात आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीवरही निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष आहे.
बांकुरा, पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर, दक्षिण 24 परगणा येथे केंद्रीय सुरक्षा दलांच्या एकूण 651 तुकड्यांची तैनाती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत टीएमसीला 21 जागा, कॉंग्रेसला 3, सीपीएमला 4, सीपीआय 1 आणि भाजपला 1 जागा मिळाली होती, तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत टीएमसी 18 आणि भाजपला या 30 पैकी 12 जागांवर मताधिक्य मिळाले होते.
WB-Assam 2nd Phase Voting begins PM Modi appeals for record turnout
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App