कॉँग्रेसचे आसाममध्ये फुटीचे राजकारण; मात्र पंतप्रधानांची सबका साथ, सबका विकास घोषणा

काँग्रेसला लोकांमध्ये बोडो आणि इतर, आसामी-बंगाली, हिंदू-मुस्लीम, वरील आसाम-खालील आसाम, आदिवासी-बिगरआदीवासी अशी फूट पाडू पाहत आहे. नरेंद्र मोदींची घोषणा मात्र सबका साथ सबका विकास अशी आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.Congress’s divisive politics in Assam; But with the Prime Minister’s Sabka, Sabka Vikas announcement


विशेष प्रतिनिधी 

गुवाहाटी : काँग्रेसला लोकांमध्ये बोडो आणि इतर, आसामी-बंगाली, हिंदू-मुस्लीम, वरील आसाम-खालील आसाम, आदिवासी-बिगरआदीवासी अशी फूट पाडू पाहत आहे. नरेंद्र मोदींची घोषणा मात्र सबका साथ सबका विकास अशी आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.

आसाममधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी कामरुप येथे प्रचारसभा घेतली. काँग्रेसवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप करत हल्लाबोल केला. शहा म्हणाले, भाजपा सत्तेत आल्यानंतर राज्याचा सर्वसमावेशक विकास करण्यास प्राधान्य देईल.अल्पसंख्यांसहीत सर्वांना समान सोयी उपलब्ध करुन दिल्या जातील. आम्ही जेव्हा घरोघरी पाणी पुरवू तेव्हा प्रत्येक घरात पाणी पुरवलं जाईल. यामध्ये मुस्लिमांच्या घरांचाही समावेश असेल. आम्ही जेव्हा सर्वांना घरं देऊ तेव्हा त्यामध्ये अल्पसंख्यांक सामाजातील लोकांचाही समावेश असेल.

अल्पसंख्यांक, आदिवासी, बोडो या सर्वांना १० हजार रुपयांची मदत केली जाईल. शेतकºयांनाही आसाम सरकार मदत करेल.आसाममध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २७ मार्च पार पडलं. विधानसभा निवडणुकींचे निकाल २ मे रोजी लागणार आहेत.

Congress’s divisive politics in Assam; But with the Prime Minister’s Sabka, Sabka Vikas announcement

Holi 2021 PM Modi wished people a happy Holi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*