विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसच्या दैनंदिन प्रेस कॉन्फरन्स मध्ये आज प्रवक्ते पवन खेडा यांनी नौटंकी केली. वॉशिंग मशीन मध्ये “भ्रष्टाचारी” टी-शर्ट घालून, काढला टी-शर्ट बीजेपी!! Washing Machine analogy for their allegations that the cases against any person who joins the BJP
त्याचे झाले असे :
काँग्रेसची आज नियमित प्रेस कॉन्फरन्स 24 अकबर रोड या मुख्यालयात झाली. त्या मुख्यालयात आधीपासूनच एक वॉशिंग मशीन आणून ठेवले होते. त्या वॉशिंग मशीन वर “बीजेपी वॉशिंग मशीन” असे लिहिलेला कागद चिकटवला होता. काँग्रेसचे प्रवक्ते पवनखेडांनी प्रेस कॉन्फरन्स सुरू करतानाच भाजपमध्ये गेलेले सगळे भ्रष्टाचारी साफ सुथरे होऊन बाहेर पडतात, असे वक्तव्य केले. त्यासाठी पुरावा म्हणून आपण भाजप वॉशिंग मशीन आणल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर त्यांनी आपल्या हातात एक टी-शर्ट घेतला. त्या टी-शर्ट वर भ्रष्टाचारी, स्कॅम, घोटाळा असे सगळे शब्द लिहिले होते. त्यांनी तिथे असलेल्या एका कार्यकर्त्याला तो टी-शर्ट वॉशिंग मशीन मध्ये घालायला सांगितला. वॉशिंग मशीनची सगळी बटणे फिरवायला सांगितली आणि त्यानंतर तो टी-शर्ट काढायला सांगितला.
#WATCH | Delhi: During a press conference, Congress leader Pawan Khera used the 'Washing Machine' analogy for their allegations that the cases against any person who joins the BJP, are squashed. pic.twitter.com/9ChOwFf9BH — ANI (@ANI) March 30, 2024
#WATCH | Delhi: During a press conference, Congress leader Pawan Khera used the 'Washing Machine' analogy for their allegations that the cases against any person who joins the BJP, are squashed. pic.twitter.com/9ChOwFf9BH
— ANI (@ANI) March 30, 2024
कार्यकर्त्याने त्याप्रमाणे सगळे करून भ्रष्टाचारी, स्कॅम, घोटाळा असे लिहिलेले टी-शर्ट धुतला गेल्याचे भासवले आणि वॉशिंग मशीन मधून नवीन टी-शर्ट बीजेपी असे लिहिलेला टी-शर्ट काढून पवन खेडांच्या हातात दिला. पवन खेडांनी तो प्रेस कॉन्फरन्स मध्ये फडकवला आणि भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये कुठलाही भ्रष्टाचारी नेता धुवून साफसूत्र होऊन बाहेर निघतो, असा “जादूचा प्रयोग” त्यांनी करून दाखवला.
त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांची करमणूक झाली. पवन खेडांनी बाकी प्रेस कॉन्फरन्स मध्ये भाजपवर काय आरोप केले?, काँग्रेसचे कसे समर्थन केले?, याची बातमी करण्याची गरज उरली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App