विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या काळात एक्सप्रेस वे पासून अनेक प्रकल्पांचे खासगीकरण झाले. कॉँग्रेसच्या सरकारच्या प्रमुख असलेल्या तुमच्या आई सोनिया गांधी यांनी देश विकत होत्या का? असा पलटवार केंद्रीय मंत्री स्मृति ईराणी यांनी राहूल गांधी यांच्यावर केला आहे.Was your mother selling the country then? Smriti Irani’s retaliation against Rahul Gandhi
मोदी सरकार पारदर्शकतेने देशाच्या तिजोरीत भर टाकत आहे. कॉँग्रेसने मात्र लुटारूंना साथ दिली होती, असेही त्या म्हणाल्या.राहूल गांधी यांनी केंद्राच्या राष्ट्रीय विमुद्रीकरण पाईपलाईन योजनेवर टीका करताना मोदी सरकारने देश विकायला काढला आहे, अशी टीका केली होती.
याबाबत स्मृति ईराणी म्हणाल्या, कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने २००८ मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशनचे खासगीकरण केले होते. त्यावेळी आपल्या आई देश विकत होत्या का? कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील विविध राज्यांतील सरकारे खासगीकरणाच्या माध्यमातून निधी उभा करत आहेत. ते आपल्या राज्यांना विकत आहेत का?
ईराी म्हणाल्या, पुणे-मुंबई एक्सप्रेस वेचे आठ हजार कोटी रुपयांचे खासगीकरण करण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने एक्सप्रेस वे विकला होता असे राहूल गांधींना म्हणायचे आहे का? २००६ मध्ये देशात विमानतळांच्या खासगीकरणाला सुरूवात करण्यात आली. त्यावेळी सोनिया गांधी सरकार चालवित होत्या. रस्ते, रेल्वे आणि विमानतळेही त्यावेळी विकून टाकली असे राहूल गांधी यांना म्हणायचे आहे का?
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App