वृत्तसंस्था
कोलकता : प. बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाल्यामुळे तृणमूल काँग्रेसमधून पक्षांतर केलेले अनेक नेते आता सत्ताधारी पक्षात परतू लागले आहेत. मुकुल रॉय यांनी नुकतीच भाजपची साथ सोडली. यामुळे आता भाजपमधील जुन्या नेत्यांनी त्यांचे हिशेब चुकते करण्यास सुरुवात केली आहे. war of words in BJP leaders
भाजपचे ज्येष्ठ नेते तथागत रॉय यांनी मुकुल ऱॉय हे विरोधी पक्षाचे हेर होते असा आरोप केला आहे. मुकुल यांच्याशी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांची अवास्तव जवळीक असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तर त्याग न करता सत्ता उपभोगण्यास आतुर असलेल्या फितूरांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येईल, असे आता भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल शाखेचे प्रमुख दिलीप घोष यांनी स्पष्ट केले.
घोष म्हणाले की, राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल यांच्या जाण्याने कोणताही फरक पडणार नाही. काही व्यक्तींना पक्ष बदलण्याची सवयच असते. एखाद्याला भाजपमध्ये राहायचे असेल तर त्यांना त्याग करावा लागेल.
विधानसभा निवडणूक निकालाचे भाजपच्या बंगाल शाखेत अजूनही पडसाद उमटत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आपल्याला मुद्दाम बाजूला ठेवण्यात आल्याची भावना वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे. केंद्रातील नेत्यांच्या सूचनेवरून तृणमुलमधून आयात करण्यात आलेल्या नेत्यांना झुकते माप देण्यात आल्याचा त्यांना दावा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App