कोरोनाविरूद्ध युद्ध !आर्मी-नेवी-एयरफोर्स देशवासियांचे प्राण रक्षक ; २४ तास ऑन ड्यूटी;संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती


  • अर्ध्या डझनहून अधिक शहरांमध्ये सैन्याने कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत, जिथे २४ तास कोरोना रूग्णांवर उपचार केले जातात
  • एअरफोर्स परदेशातून ऑक्सिजन आणत आहे.
  •  शक्य तितक्या लवकर ऑक्सिजन देशात पोहोचविण्याचे काम आर्मी करत आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली:देशभरात कोरोनाने परिस्थिती भयावह होत आहे. अशावेळी देशाच्या शत्रूपासून  रक्षण करणार्‍या आपल्या सैन्याने आता कोरोना विरूद्ध युद्ध सुरू केले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की आर्मी-नेवी-एयरफोर्स देशवासियांचे प्राण वाचविण्यात गुंतले आहेत. ते म्हणाले की कोव्हिड-19 चा सामना करण्यासाठी लष्कराला आर्थिक निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यांना क्वारंटाईन सेंटर पासून दवाखाने बनवन्यापर्यंत काहीही खरेदी करण्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.War against Corona! Army-Navy-Air Force is the lifeblood of the countrymen; 24 hours on duty; Information of Defense Minister Rajnath Singh

राजनाथ यांनी सांगितले की गरजेनुसार दिल्ली, लखनऊ, बेंगळुरू आणि पटना सारख्या बड्या शहरांमध्ये सैन्याने जोडलेल्या रुग्णालयांची व्यवस्था वाढविली जात आहे.  राज्य सरकारच्या गरजेनुसार पुढील ठिकाणावर देखील  सुरूवात केली जाईल. सैन्याने आतापर्यंत देशभरात 4 हजार बेड आणि 585 आयसीयू युनिट तयार केले आहेत. दिल्लीतील आर्मी बेस हॉस्पिटलचे पूर्णपणे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर झाले आहे. त्याची क्षमता 400 खाटांवरून 1000 बेडपर्यंत वाढविण्यात आली आहे.

लष्करानचे एमपी , यूपी आणि झारखंडमध्ये कोविड सेंटर

उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि लखनऊ येथे लष्कराने 100  बेड तयार केले आहेत. या व्यतिरिक्त लष्कराने मध्य प्रदेशातील सागरमध्ये 40 बेडचे आयसोलेशन सेंटर देखील सुरू केले आहे. तसेच येथे रुग्णवाहिकेची सुविधा देखील  आहे. भोपाळ, जबलपूर आणि ग्वाल्हेरमध्येही प्रत्येकी 40 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. झारखंडच्या नामकुममध्ये 50 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कामती येथे 60 खाटांचे आयसीयू  सुरू करण्यात आला आहे. याशिवाय राजस्थानमधील बाडमेरमध्ये 100 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. लष्कराचे 200 ड्रायव्हरही स्टँडबाय मोडवर आहेत, ऑक्सिजन वितरीत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

हवाई दल

जगभरातून ऑक्सिजन घेऊन लवकरात लवकर ऑक्सिजन पोचविण्याची जबाबदारी हवाई दलाने स्वीकारली आहे. देश-विदेशातून ऑक्सिजन आणण्याचे काम हवाई दल करत आहे. आतापर्यंत परदेशातून 61 ऑक्सिजन कंटेनर आणले आहेत. याची क्षमता 1142 मेट्रिक टन ऑक्सिजन आहे. एअरफोर्सने देशभरात 230 टँकरचा पुरवठा केला आहे. त्यांची क्षमता 4527 मेट्रिक टन आहे.

आर्म्ड फोर्स मेडिकल सर्विस (AFMS) ने सेवानिवृत्त डॉक्टरांना बोलावले

सशस्त्र बल वैद्यकीय सेवा (एएफएमएस) ने अनेक रुग्णालयात डॉक्टर, तज्ञ आणि पॅरामेडिकल तैनात केले आहेत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत या संस्थेत शॉर्ट सर्व्हिस कमिशनवर कार्यरत 238 डॉक्टरांची मुदतवाढ दिली आहे .अलीकडे एएफएमएसमधून निवृत्त झालेल्या हेल्थ प्रोफेशनल्सना परत कर्तव्यावर बोलावण्यात आले आहे.

नेव्हीने माल पाठवण्याचे काम हाताळले

नेव्हीने ऑक्सिजन वितरीत करण्यात आपली बरीच जहाजं गुंतविली आहेत. ऑक्सिजनची पहिली खेप बहिरेनहून मंगलोर, कर्नाटक येथे आयएनएस तलवार ने  पोहचवली .या व्यतिरिक्त ऑक्सिजन टाक्या आयएनएस जलास्व आणि  आयएनएस ऐरावतमार्फत कोलकाता आणि कोची येथे पाठविण्यात आल्या. नौदलाने दोन ऑक्सिजन  प्रकल्पांची दुरुस्तीही केली आहे. यामार्फत दररोज 1800 ऑक्सिजन सिलिंडर ऑक्सिजन मिळत आहे.

दिल्ली ते बनारस पर्यंत डीआरडीओ बनवत आहे कोव्हिड सेंटर

दिल्ली आणि लखनऊमध्ये 500 बेड आणि अहमदाबादमध्ये 900 बेडची व्यवस्था . त्याचप्रमाणे पाटण्यातील कोविड सेंटरमध्ये ईएसआयसी हॉस्पिटलचे रूपांतर करून 500 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच मुझफ्फरपूर आणि वाराणसी (बनारस) मध्येही रुग्णालये बांधली जात आहेत. या रुग्णालयांना डीआरडीओ तांत्रिक सहाय्य देखील करीत आहे.

500 मेडिकल ऑक्सिजन प्लांट स्थापित
डीआरडीओने आतापर्यंत पीएम केअर फंड द्वारे 500 मेडिकल ऑक्सीजन प्लांट तयार केले आहेत. त्यापैकी 332 ची व्यवस्था  टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टम्स लिमिटेड व 48 ची व्यवस्था  ट्रायडंट न्यूमेटिक्स प्रा.लि.सांभाळत आहेत .
या व्यतिरिक्त, भारतीय पेट्रोलियमच्या मदतीने 120 प्रकल्प चालविण्यात येत आहेत. दिल्लीतील एम्स आणि आरएमएल रुग्णालयात 2 प्रकल्प  स्थापित करण्यात आले आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) च्या मदतीने संरक्षण क्षेत्रातील कंपन्याही मदत करत आहेत . हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि ऑर्डिनेन्स फॅक्टरी बोर्डसुद्धा कोविड सर्व्हिस देत आहेत. एचएएलने बेंगळुरूमध्ये 180 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले असून आयसीयू आणि ऑक्सिजन सुविधा देखील येथे आहेत. पीएसयूने बंगळुरूमध्ये 250 बेडची व्यवस्था केली आहे आणि महापालिकेच्या स्वाधीन केली आहेत.

कॅन्टोन्मेंट बोर्डाची रुग्णालये
30 कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यरत असून 40 सामान्य रुग्णालये  आहेत. यामध्ये 1240 बेडची व्यवस्था आहे. यापैकी 37 मध्ये ऑक्सिजन बेडचीही व्यवस्था आहे. एनसीसीचे अधिकारीदेखील कोरोना काळात आपली भूमिका बजावत आहेत. त्यांना राज्य सरकारच्या पाठिंब्यासाठी अनेक राज्यात तैनात करण्यात आले आहे  .

War against Corona! Army-Navy-Air Force is the lifeblood of the countrymen; 24 hours on duty; Information of Defense Minister Rajnath Singh

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात