Waqf JPC चे सदस्य चहा पाण्यासाठी एकत्र, तिथे हास्यविनोद; पण मुख्य बैठकीत गदारोळ; फायनल रिपोर्ट 14 विरुद्ध 11 ने संमत!!

Waqf JPC

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Waqf JPC अर्थात वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भातल्या संयुक्त संसदीय समितीची आज अखेरची बैठक होती. त्यावेळी समितीचे सगळे सदस्य चहा पाण्यासाठी एकत्र आले. तिथे जोरदार हास्य विनोदही झाले, पण मुख्य बैठकीत नेहमीप्रमाणे गदारोळ झाला आणि वक्फ कायदा सुधारणा संयुक्त संसदीय समितीचा फायनल रिपोर्ट 14 विरुद्ध 11 अशा मतांनी आज संमत झाला.

आजच्या बैठकीला अध्यक्ष खासदार जगदंबिका पाल, असदुद्दीन ओवेसी, कल्याण बॅनर्जी, अरविंद सावंत, मेधा कुलकर्णी, तेजस्वी सूर्या, ए. राजा यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला चहापाणी झाले त्यावेळी सगळ्या सदस्यांनी एकाच टेबलजवळ बसून हास्यविनोद केले. यात सत्ताधारी आणि विरोधी सदस्य देखील सामील झाले.

पण मुख्य बैठकीच्या वेळी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे गदारोळ झाला. खासदार असदुद्दीन ओवैसी, कल्याण बॅनर्जी, अरविंद सावंत, ए. राजा वगैरे यांनी अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्याविरुद्ध तक्रारीचा पाढा वाचला. समितीचा 656 पानांचा अंतिम रिपोर्ट काल सायंकाळी मिळाला. त्यावर आम्ही आमच्या लेखी सुधारणा एका रात्रीत कशा देणार, परंतु अध्यक्षांनी आमच्यावर ते बंधन लादले. त्यामुळे आम्ही मतभेदांची नोट संबंधित रिपोर्ट बरोबर अध्यक्षांकडे सादर केली, असे या सगळ्या खासदारांनी सांगितले. संयुक्त संसदीय समितीचा अंतिम अहवाल 14 विरुद्ध 11 मतांनी संमत झाला. आता हा अहवाल अध्यक्ष जगदंबिका पाल उद्या लोकसभेच्या सभापतींकडे सुपूर्द करणार आहेत. त्यानंतर सभापती पुढची कार्यवाही करतील.

Waqf JPC members gather for tea

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात