Sanjay Raut : मुंबईत स्वबळावर, महाराष्ट्रात इतरत्र आघाडी, संजय राऊत न्यांचा फॉर्मुला

Sanjay Raut

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay Raut महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष वेगवेगळे लढणार असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता नवा फॉर्मुला मांडला आहे. मुंबईत स्वबळावर पण महाराष्ट्रात इतरत्र आघाडी करून महापालिका निवडणूक लढणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्या मुंबईवर अनेक वर्षांनी शिवसेनेचा पगडा आहे. शिवसेनेने इथे सातत्याने आपली पकड ठेवली आहे आणि ती तशीच ठेवायची असेल तर स्वबळावर लढलं पाहिजे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, असे राऊत म्हणाले.Sanjay Raut



राऊत म्हणाले, आज पुणे किंवा पिंपरी चिंचवड भागातील पदाधिकाऱ्याच्या बैठका आहेत. विधानसभा, लोकसभा निवडणूका संपल्या आहेत. लोकसभेत आम्ही जिंकलो, विधानसभेत पराभूत झालो. त्याची कारणं देशाला समजली आहेत. त्या पराभवाने खचून न जाता पुढील सर्व निवडणूका आम्हाला लढवाव्याच लागतील, त्यासाठी तयारी सुरू आहे. स्वबळाचा नारा दिलाय याचा अर्थ महाविकास आघाडी संपली किंवा तुटली असा काढता येणार नाही. हा विषय मुंबई पुरता आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, त्या मुंबईवर अनेक वर्षांनी शिवसेनेचा पगडा आहे. शिवसेनेने इथे सातत्याने आपली पकड ठेवली आहे आणि ती तशीच ठेवायची असेल तर स्वबळावर लढलं पाहिजे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावना शिवसेना पक्ष प्रमुखांनी व्यक्त केली आहे, ही परिस्थिती इतर शहरात किंवा जिल्ह्यात असेल का याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे तिथे तीनही पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं आहे की एकत्र लढणं गरजेचं आहे, तिकडं त्या-त्या कार्यकर्त्यांच्या भूमिका लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ.

राऊत हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे) पक्षात फूट पडणार असल्याचा दावा करत आहेत. त्याचा पुनरुच्चार करत ते म्ह्म्णाले,
शिंदे गटात उदय होणार आहे. मला कोणाची नावं घ्यायची नाहीत. पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली. त्याच प्रमाणे अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल आणि त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांचा पक्ष तोडला जाईल. भारतीय जनता पक्षाला देशभरात पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. फक्त इथे नाही, चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचा पक्ष देखील तोडला जाईल. यांच्या जि‍भेला रक्त लागलं आहे. जोपर्यंत ही चटक आहे, तोपर्यंत फोडा फोडीचं राजकारण सुरू राहिल.

On his own in Mumbai, leading elsewhere in Maharashtra, Sanjay Raut’s formula

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात