उत्तर प्रदेशात ५४ जागांसाठी मतदान सुरु; आज अखेरचा मतदानाचा सातवा टप्पा

वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेसाठी सातव्या व शेवटच्या टप्प्यासाठी ५४ जागांसाठी सोमवारी मतदानास सुरुवात झाली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा जागांचा समावेश असून ६१३ उमेदवारांचे भवितव्य निश्चित होईल. Voting begins for 54 seats in Uttar Pradesh; Today is the seventh round of voting

आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, भदोही तसेच सोनभद्र जिल्ह्यात हे मतदान होत आहे. उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान झाले होते. सत्ताधारी भाजप तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या दृष्टीने हा शेवटचा टप्पा महत्त्वाचा आहे.



जातींशी निगडित असलेल्या पक्षांची भूमिका यामध्ये निर्णायक आहे. यात भाजपचे मित्र पक्ष असलेले अपना दल तसेच निषाद पक्ष तर दुसरीकडे समाजवादी पक्षाने अपना दल (क) ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पक्ष या पक्षांशी आघाडी करत भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. सप बरोबर लोकदल तसेच अन्य पक्षही आघाडीत आहेत.

Voting begins for 54 seats in Uttar Pradesh; Today is the seventh round of voting

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात