कर्नाटक काँग्रेस आमदार बाळकृष्ण यांचं मोठं विधान
विशेष प्रतिनिधी
रामनगर : कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील मागडी येथे आयोजित सभेत काँग्रेसच्या मतांच्या राजकारणाचा खेळ उघड झाला आहे. खुद्द कर्नाटकातील एका आमदाराकडून त्याचा पर्दाफाश झाला. कर्नाटकचे आमदार एचसी बालकृष्ण यांनी एका सभेदरम्यान मंचावरून सांगितले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही काँग्रेसला मत दिले नाही तर सिद्धरामय्या यांच्या पाच हमी सर्वांनी विसराव्यात, त्या सर्व हमी निरर्थक असतील.Vote Congress in 2024 elections else forget Siddaramaiahs five guarantees
लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्यास अनेक हमी संपुष्टात आणल्या जातील. असे सत्ताधारी काँग्रेसचे आमदार एचसी बाळकृष्ण यांनी मंचावरून उघडपणे सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे रामनगर जिल्ह्यातील मागडी येथे पीपल कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे आमदार एचसी बाळकृष्ण यांनी जनतेला खासदार डीके सुरेश यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
काँग्रेस नेते बाळकृष्ण म्हणाले की, तुम्ही लोकांनी काँग्रेसला मत दिले तर आम्हीही आमची हमी कायम ठेवू. अन्यथा सर्व हमी निरर्थक ठरतील. तुम्हाला सिद्धरामय्या यांच्या हमीची गरज नाही असं समजल जाईल. तुमच्यासाठी समाजाच्या विकासापेक्षा मंदिर महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांशीही चर्चा केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App