विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मध्ये चमकदार पण अस्थिर खेळ करत भारताची टॉप ऑर्डर तंबूत परतल्यानंतर विराट कोहली आणि के. एल. राहुल यांनी भारताचा डाव सावरला. 3 बाद 76 वरून भारताचा स्कोअर 3 बाद 147 वर नेला. विराट या सामन्यात आपले 90 वे अर्धशतक पूर्ण केले. पण आपले अर्धशतक पूर्ण करून त्यात अवघ्या 4 धावांची भर टाकत म्हणजे 54 धावांवर विराट कोहली बाद झाला. त्यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम सह सर्व भारतभर सन्नाटा पसरला.Virat – Rahul duo saved India’s innings; But Virat returned to the tent after completing his 90th half-century!!
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून भारतीयांची मोठ्या खेळींची अपेक्षा होती. त्यांनी सुरुवात तशीच केली होती. रोहित शर्माने षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली, पण अर्धशतक पूर्ण करण्यात तो अपयशी ठरला. अवघ्या 47 धावांवर तो तंबूत परतला.
सारा तेंडुलकर स्टेडियम मध्ये हजर असूनही शुभमन गिल चमकदार कामगिरी करू शकला नाही. तो अवघ्या 4 धावांवर तंबूत परतला आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकून टॉप ऑर्डर मधला बॅटर श्रेयस अय्यर तेवढ्याच म्हणजे 4 धावांवरच बाद झाला.
त्यानंतर विराट कोहली आणि के. एल. राहुल यांनी भारताची कमान सांभाळली. शांत आणि संयमी खेळ करत स्कोअर बोर्ड हालता ठेवला. याच दरम्यान विराटने आपले 90 वे अर्धशतक पूर्ण केले. आता विराट मोठी खेळी उभारणार, अशी समस्त भारतीयांची अपेक्षा वाढली. पण तेवढ्यात घात होऊन विराट अवघ्या 54 धावांवर तंबूत परतला. भारताची अवस्था तेव्हा बात 4 बाद 148 होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App